लातूर : प्रतिनिधी
विलास को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, लातूर या बँकेच्या तज्ज्ञ-संचालकपदी संजय निलेगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त बँकेचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी संजय निलेगांवकर यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष अॅड. समद पटेल, संचालक सूर्यकांत कातळे, व्यंकटेश पुरी, संजय सूर्यवंशी यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते. या निवडीबद्दल माजी मंत्री तथा लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख व शहरातील मान्यवरांनी संजय निलेगांवकर यांचे अभिनंदन केले आहे.
विलास बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी संजय निलेगांवकर
एकमत ऑनलाईन