26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरसीबीएसई-१२ वी बोर्ड परीक्षेत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे उत्तूंग यश

सीबीएसई-१२ वी बोर्ड परीक्षेत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे उत्तूंग यश

एकमत ऑनलाईन

लातूर : कोविड-१९ महामारीच्या अनुषंगाने नव्यानेच लागू झालेल्या दोन सत्र परीक्षेद्वारे १२ वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निकाल दि. २२ जुलै, रोजी जाहीर झाला. या परीक्षेत शिव छत्रपती शिक्षण संस्था, लातूर संचलित संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण २३८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यापैकी २३७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.५७ टक्के आहे.

माधव संजय पाटील हा विद्यार्थी ९७.८० टक्के गुण मिळवून विद्यालयातून सर्वप्रथम आला. श्रुती संजय वीर या विद्यार्थींनीने ९६.६० टक्के गुण प्राप्त करुन सर्वद्वितीय आणि काव्या दीपक लामतुरे या विद्यार्थीनीने ९६.४० टक्के गुणासह सर्वतृतीय आली आहे. जाहीर झालेल्या निकालात एकूण ४ विद्यार्थी ९५ टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले, ४० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण, ७९ विद्यार्थ्यांना ८५ टक्क्यापेक्षा अधिक, १३४ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यापेक्षा अधिक तर १६८ विद्यार्थी ७५ टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, एसटीएनएमएसचे संचालक बी. ए. मैंदर्गी, संचालक प्रा. दिलीप देशमुख, एसटीएनएमएसच्या प्राचार्या विना कोपकर व इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या