24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरसंतोष बालगीर याचे सायकलवर भारतभ्रमण

संतोष बालगीर याचे सायकलवर भारतभ्रमण

एकमत ऑनलाईन

लातूर : मराठवाड्यातला सर्वात प्रथम सायकल वर सोलो राईड करुन भारत भ्रमण करणारा संतोष बालवीर यांच्या भारतभ्रमण प्रवासाचा गौरव विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

डिसेंबर महिन्यापासून सलग १८२ दिवस लातूरहुन केरळ, कन्याकुमारी, तामिळनाडू, आंध्रा, तेलंगाना, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्लीमार्गे कारगिल लेह लदाख येथे सायकलवर सॅल्युट टू इंडिया या मोहिमेअंतर्गत भारतभ्रमण केले. भारताचे राष्ट्रीय धरोहर जतन करण्याचे आव्हान त्याने यावेळी या यात्रेत केले.

अनेक प्रदेशात जागोजागी तिथल्या राजकीय नेत्यांनी मोठ्या मोठ्या अधिक-यांनी त्याचा या मोहिमेचा सन्मान केला. मागच्या आठवड्यात तो हा दौरा आटपून आपल्या लातूरला परतला आहे. संतोष हा मुळ लातूर तालुक्यातील वासनगावचा रहिवासी आहे. लातूर येथील लातूर सायकलिस्ट क्लबचा तो सदस्य आहे. आज त्याच्या या प्रवासाचा गौरव सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सन्मान करुन करण्यात आला.

संतोषचा हा पराक्रम इतर तरुणांसाठी प्रेरणा देणारा आहे. त्याच्या या लहान वयातील हा भारतभ्रमण यात्रा कौतुकास्पद आहे. असे मत सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले . त्याचा आज लातूर येथील आशियाना या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप, रामदास पवार, सचिन दाताळ, श्याम भोसले, संभाजी रेड्डी, मनोज चिखले हे उपस्थित होते.

विजेवर चालणारी सायकल; अर्धापूरच्या तरूणांने लावला वैज्ञानिक शोध..!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या