27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरआषाढीनिमित्त आज लातुरात संतवाणी

आषाढीनिमित्त आज लातुरात संतवाणी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालय आणि मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानसरस्वती मंदिर सभागृह, संगीतनगरी, बार्शी रोड, लातूर या ठिकाणी आषाढीनिमित्त सिने पार्श्वगायक मंगेश बोरगावकर प्रस्तुत ‘संतवाणी’ कार्यक्रम आज दि. ३ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख, ह. भ. प. उल्हासदादा पवार उपस्थित राहणार आहेत.

‘संतवाणी’ या कार्यक्रमात नाशिक येथील सुविख्यात गायिका सौ. देवश्री नवघरे यांचे सुश्राव्य गायन होणार आहे. तसेच प्रा. लक्ष्मण श्रीमंगले, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. शिवकुमार उरगुंडे, प्रा. गणेश बोरगावकर, बालगायिका भक्ती पाटील, गोपाळ पाटील आदी कलावंतांचे गायन, वादन होणार असून या संतवाणी कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन मराठवाडा संगीत कला अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉ. राम बोरगावकर सुरमणी पं. बाबुराव बोरगावकर यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या