27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरपानगाव येथील सरपंच व उपसरपंच यांचे आमदार धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक

पानगाव येथील सरपंच व उपसरपंच यांचे आमदार धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. गयाबाई दत्तात्रय कसपटे व उपसरपंचपदी शिवाजी काशिनाथ आचार्य या काँग्रेस विचारांच्या पदाधिका-यांची पहिल्या २० महिन्यांसाठी बिनविरोध निवड झाली. याबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध रहावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, ट्वेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, सचिन दाताळ, बंडू किसवे, पॅनल प्रमुख चंद्रचूड चव्हाण, विवेक चव्हाण, अभिजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या