22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरसोयाबीनच्या बियाणांसाठी ससेहोलपट

सोयाबीनच्या बियाणांसाठी ससेहोलपट

एकमत ऑनलाईन

चापोली : यंदा मृग नक्षत्रचा पाऊस पेरणी योग्य व पुरेसा झाला असला तरी बाजारात बी बियाणे व खत खरेदी करणा-या शेतक-यांंच्या पदरी निराशाच आली आहे. काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी बी बियाणे खरेदीसाठी बाजारात फिरत आहेत. पण कोठेही सोयाबीन बियाणे व खते उपलब्ध होत नसल्याने शेतक-यांसमोर खरिपाच्या पेरणीसाठी खुप मोठे संकट उभे राहिले आहे.

बाजारात सध्या खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतक-­यांची लगबग, वर्दळ वाढली आहे. आपणास हवे त्या कंपनीचे बी बियाणे घेण्याची इच्छा असतानाही तशा प्रकारची बियाणे, खत बाजारात उपलब्ध नसल्याने शेतक-­यांना, जे मिळेल, ते धन्य. मानून बी बियाणे व खत घेण्याची वेळ आली आहे. महाबीज बी बियाणे बाबत तर प्रचंड निष्काळजीपणा यंदा सरकार पातळीवरुन झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच महाबीजचे सदोष बी बियाणे परत घेतल्याची चर्चा होत असल्याने अन्य दुय्यम दर्जाचे कंपनीचे बी बियाणे तेही जास्त दराने शेतक-­यांना खरेदी करावे लागले असल्याची चर्चा होत आहे. तसेच अनेक शेतकरी सोयाबीन बी बियाणे साठी अनेक दुकानात जाऊन खेटे घालत आहेत. तरीही त्यांना कोणत्याही कंपनीचे बी बियाणे मिळत नाहीत. यामुळे निराश झालेले शेतकरी जे मिळेल ते जुने सोयाबीन हे शेतात पेरणी करताना दिसत आहेत. हे जुने बी बियाणे उगवले तर शेतकरी शेतक-यांना यंदा आर्थिक संकटास सामना करावा लागणार आहे.

प्रशासनाने लक्ष घालावे
सद्यस्थितीत बरीच शेतक-यांना सोयाबीन बियाणे दुकानात उपलब्ध झाली नाहीत. यामुळे जुनी सोयाबीन बी बियाणे घेऊन पेरणी केली. तसेच शेतामध्ये पेरणीसाठी रासायनिक खते मिळाली नाहीत. यामुळे शेतातील उत्पन्न कमी होणार आहे. यामुळे प्रशासनाने व शासनाने याकडे लक्ष घालून शेतर्क­यांची होत असलेली गैर सोय दुर करावी. जेणेकरून शेतकरी आर्थिक अडचणीत येणार नाही.
-रमेश पाटील, युवक, चापोली.

बियाणे मिळेना
सध्या बाजारात सोयाबीन बियाणे व खते उपलब्ध होत नसल्याने ज्या शेतक-यांकडे जुने सोयाबीन आहे. तेच बियाणे घेऊन शेतात पेरणी केली आहे. शेतातील पेरणी केलेली बी बियाणे जुनी असल्याने उगवण क्षमता किती येईल, याची खात्री नाही. तसेच झालेली सोयाबीन उगवण ही योग्य असे उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे शेतातील झालेला खर्च भरून कसा निघणार यामुळे शेतकरीचिंताग्रस्त आहेत.
-सुधाकर शंकरे, शेतकरी, शंकरवाडी .

टाळ, मृदंगासह वारक-यांचे भजन आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या