22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरसत्संगाने मानवाची अध्यात्मिक आस्था बळकट होते

सत्संगाने मानवाची अध्यात्मिक आस्था बळकट होते

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सत्संगानेच माणसाची नाळ परमेश्वराशी जुडते आणि अध्यात्मिक आस्था बळकट होते, असे संबोधन सद्गुरु सुदीक्षाजी महाराज यांनी येथील संत हरदेवजीनगर येथे आयोजित निरंकारी संत समागमामध्ये केले.

सद्गुरु माताजी पुढे म्हणाल्या, संसारात होत असलेली भक्ती ही ईश्वराला न जाणता प्रत्यक्ष ज्ञानानूभवाशिवाय होत आहे त्यामुळे त्यात भिती आणि भौतिकते९चा लोभ, अपेक्षाांचा प्रभाव जाणवतो. परंतू, ज्यावेळी प्रभू परमात्माच्या अनुभूतीने भक्ती केली जाते त्यावेळी ती भक्ती स्वार्थाकरीता नव्हे तर स्वार्थरहित होत असते. संतांचे जीवन नेहमी जनमानसासाठी प्रेरणास्त्रोत्र राहिले आहे. परिस्थिती कशीही असो संत झोपडीत राहो की महालात राहो, संत नेहमी ईश्वराचे धन्यवाद मानतो. सर्वाच्या भल्याची कामना करतो. कर्माने सर्वांचे भलेच करीत जातो.

संत जीवनाच्या अवस्थेबद्दल चिकित्सक रुपात समजावीत सद्गुुरु माताजी म्हणाल्या, ब्रह्मज्ञानाने ज्यावेळी ही जाणिव होते की तन, मन, धन हे प्रभू परमात्म्याची ठेव आहे. त्यामुळे त्याच्या माध्यमातून होणा-या सा-या सेवेचा कर्ता केवळ परमात्माच असतो. त्यामुळे भक्ताच्या मनात अहंकारही निर्माण होत नाही आणि प्रत्येकाच्या ठायी ईश्वराचेच रुप बघत असल्यामुळे कुणाच्याही प्रती त्याच्या मनात द्वेष, घृणा निर्माण होत नाही.

संत प्रत्येक कार्याचा कर्ता ईश्वरालाच मानीत असतो. संसारात विचरण करीत सत्संग सेवा स्मरणाच्या माध्यमातून परमात्म्याशी जुडून राहातो आणि त्याच बरोबर आपली सांसरीक कर्तव्य ही ईश्वरीय इच्छा मानून सहजतेने निभावित असतो, असे पावन आशिर्वाद माताजीनी प्रदान केले. लातूर झोनचे प्रभारी इंद्रपाल नागपाल यांनी माताजींचे आभार मानले. या सत्संगास लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि कर्नाटक सीमाभागातून संतांनी सहभाग घेऊन
सद्गुरु माताजी यांचे प्रवचनाचा लाभ घेतला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या