26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूररेणापूर कॉंंंग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

रेणापूर कॉंंंग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

एकमत ऑनलाईन

रेणापूर : केंद्रातील भाजपाचे सरकार राजकीय सूडबुद्धीने काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना ईडीमार्फत लक्ष करीत असल्याचे मंगळवारी संपूर्ण देश पाहत आहे. त्याच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहण्यासाठी रेणापूर शहर व तालुका कॉग्रेसच्या वतीने येथील गांधी पुतळ्याजवळ मंगळवारी दि. २६ जुलै रोजी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील भाजपा सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. हे हुकूमशाही शासन ईडी, सीबीआय या केंद्रीय तपासयंत्रणेचा करीत असलेल्या गैरवापराविरुद्ध व काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दि. २६ रोजी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात रेणापूर तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रमोद जाधव, शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, महिला कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा पुजा विशाल इगे, शहराध्यक्षा निर्मला गायकवाड, श्रीनिवास अकनगिरे,नगरपंचायतीचे माजी गटनेते पद्म पाटील, ओबीसीचे तालुकाध्यक्ष अनिल पवार, माजी सभापती बाळकृष्ण माने,अनु. जाती विभागाचे तालुकाध्यक्ष अजय चक्रे, माजी नगरसेवक रामंिलग जोगदंड, भुषण पनुरे, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब करमुडे, आबासाहेब बनसोडे,पंडीत माने,जनार्धन माने, दामोदर साळुके, पाशामियाँ शेख, शहरसचिव गणेश सौदागर, सरपंच महेश खाडप, रामहरी गोरे, अ‍ॅड. शेषेराव हाके, अ‍ॅड. प्रशांत अकनगिरे, सचिन इगे, प्रदिप काळे, अभिजीत काळे, दत्ता वाघमोडे, राज खाडप, भास्कर तेरकर, दादाराव कांबळे, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या