20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeलातूरदेवणी तालुक्यात मोफत पुस्तक वाटपाचा बोजवारा

देवणी तालुक्यात मोफत पुस्तक वाटपाचा बोजवारा

एकमत ऑनलाईन

देवणी : शासनाच्या शासकीय विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या मोफत पुस्तक योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे देवणी तालुक्यात स्पष्ट झाले आहे. शैक्षणिक प्रथम सत्र सुरू होऊन चार महिने होत आले तरीही काही शाळा व शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या शिक्षण विभागाच्या महत्त्वकांक्षी योजनेनुसार जिल्हा परिषद व खाजगी संस्था शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणा-या सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच विषयाची मोफत पुस्तके देण्याची योजना सुरू आहे. सदर पुस्तके ही शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. या योजनेप्रमाणे तालुक्यातील काही शाळांमधून काही विद्यार्थ्यांना कमी-अधिक पुस्तके वाटण्यात आली.

सदरील पुस्तके शाळा पोहोच देण्याऐवजी तालुक्याच्या मुख्यालयी देण्यात आली आहेत. सदरील पुस्तके मुख्यालयमध्ये शिक्षकांना बोलावून देण्यात आली आहेत. पुस्तके वाटप होत असताना कोणत्या शाळेत कोणत्या वर्गाची किती विद्यार्थी संख्या आहे याचा लेखी अहवाल न घेता तथा वाटपाचा ताळमेळ न बसवता पुस्तके शिक्षकांनाच घेण्यास सांगण्यात आल्याने अनेक शाळांनी आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल तितके पुस्तके घेऊन गेल्याचे समजते. यामुळे काही शाळेत अधिक पुस्तके गेली तर
काही शाळेत विद्यार्थी संख्येपेक्षा कमी पुस्तके गेली.

विशेषत: काही शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप एकही पुस्तक मिळू शकले नाही पुस्तकांच्या भाषेची व विषयाचे पण नियोजन नसल्याने नको त्या शाळेत नको त्या भाषेची व विषयाची पुस्तके गेली आहेत. तालुक्यातील विळेगाव येथील केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा महाराष्ट्र राज्य योजना अंतर्गत जिल्ह्यात पतदर्शी शाळा म्हणून गतवर्षी पहिलीसाठी योजना राबवली यंदा हीच योजना दुसरी वर्गासाठी राबविण्याचे नियोजन असताना सदर शाळेत पहिली व दुसरीचे पुस्तके अद्याप मिळाली नसल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या