22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeलातूरशाळाबा मुलांनाही देणार जंतनाशक गोळ्या

शाळाबा मुलांनाही देणार जंतनाशक गोळ्या

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत दि. १० ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याबरोबरच शाळाबा मुलांनाही आशा कार्यकर्तीमार्फत जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम वर्षातून दोनवेळा राबविण्यात येते. यंदा ही मोहीम शाळा व अंगणवाड्यांमध्ये दि. १० ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे. दि. १७ ऑक्टोबर रोजी उर्वरीत लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यासाठी मॉपअप दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्वच विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना या गोळ्या दिल्या जाणार आहेतच शिवाय शाळाबा विद्यार्थ्यांनाही आशा कार्यकर्तींमार्फत घरभेटीतून या गोळ्या खाऊ घालण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळ्या ही संजीवनी आहे.

आतड्यांमधील कृमी दोष बालकांमध्ये व किशोरवयीन मुलामुलींमध्ये होणा-या रक्तक्षय व कुपोषणास जबाबदार आहे. यामुळे मुलामुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील आरोग्य, शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतात. यामध्ये तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी लवकर आजारी पडतात. तसेच त्यांना लवकर थकवा येतो, अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यामुळे शाळेत अनुपस्थितीचे प्रमाण वाढते. आतड्यांतील कृमी दोष हे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दुषीत माती, अस्वच्छ हात, अस्वच्छ फळे, भाज्या व अन्नांमुळे फार सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडीतून दिइली जाणारी जंतनाशक गोळी ही यावर फार परिणामकारक आहे. या मोहिमेचा मुलामुलींचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवणाचा दर्जा उंचावणे हा आहे.

मुलामुलींना न चुकता शाळा व अंगणवाडीत जंतनाशक गोळी खाऊ घालावी, हात स्वच्छ धुवावेत, शौचालयाचा नियमित वापर करावा, पायात चपला व बुट घालावेत, निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे, व्यवस्थित शिजवलेले अन्न खावे, निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या