20.8 C
Latur
Friday, January 22, 2021
Home लातूर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शाळांची तंबाखूमुक्तीकडे वाटचाल

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शाळांची तंबाखूमुक्तीकडे वाटचाल

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील शाळांची तंबाखूमुक्तीकडे वाटचाल सुरू असून राहिलेल्या ३४ टक्के शाळांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचनालय व सलाम मुंबई फौउंडेशन सध्या ‘तंबाखूमुक्त शाळा अभियान’ महाराष्ट्रात राबवित आहे. यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, अभिनव गोयल, शिक्षणाधिकारी डॉ वैशाली जामदार यांच्या आदेशानुसार सलाम मुंबई फौउंडेशनच्या जिल्हा समनव्यक शुभांगी लाड, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, तालुका समनव्यक सुशीलकुमार पांचाळ, राहुल खरात यांनी तालुक्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

या अभियानात शिरूर अनंतपाळ तालुका लातूर जिल्ह्यातील १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा तालुका करण्यासाठी पंचायत समिती व गट साधन केंद्रातील साधनव्यक्ती पुढे सरसावले असून शिल्लक राहिलेल्या शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी मुख्याध्यापकांना झूम मिंिटगद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येत आहे. ११ निकष कसे पूर्ण करावे, पुरावे कसे अपलोड करावे याचे सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.

गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, केंद्रप्रमुख शिवाजी एरंडे, सूर्यकांत येडले यांच्यासह तालुका समन्वयक सुशीलकुमार पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रसमन्वयक शंकर स्वामी, दत्तात्रय शिरुरे, किरण आवाळे हिरानंद सगर, गजानन क्षीरसागर व गट साधन केंद्राचे सर्व साधनव्यक्ती परिश्रम घेत आहेत.

मुख्य रस्ता खुला करण्यासाठी मनसेचे ठिया आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या