23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरमहाराष्ट्र महाविद्यालयात सायन्स क्विज मास्टर स्पर्धा

महाराष्ट्र महाविद्यालयात सायन्स क्विज मास्टर स्पर्धा

एकमत ऑनलाईन

निलंगा : महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाच्या वतीने केबीसीच्या धर्तीवर कौन बनेगा सायन्स क्विज मास्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे ९ विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांचे तीन गट करण्यात आले. प्रत्येक गटास केबिसीच्या धर्तीवर संगणकाच्या माध्यमातून १० प्रश्न विचारण्यात आले. त्यातुन गुणानूक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या गटास महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ माधव कोलपूके यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ कोलपुके यांनी विद्यार्थ्यांना संगणकाच्या सहाय्याने पहिला प्रश्न विचारून या स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. धनंजय जाधव व भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकुमार कदम यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात योगदान दिले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.गजेंद्र तरंगे हे उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत घेतलेल्या उत्स्फूर्त प्रतीसादाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. परीक्षक म्हणून डॉ.चंद्रकुमार कदम यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या स्पर्धेचे संचलन विज्ञान मंडळाचे समन्वयक रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुरेश कुलकर्णी यांनी केले तर प्रा. राहूल ढगे यांनी आभार व्यक्त केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आझादी का अमृतमहोत्सव समितीचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.सचीन बसुदे, डॉ. धनराज बिराजदार, प्रा.अजीत सगरे, प्रा.रेश्मा चौधरी, प्रा. शामल माळी, प्रा. स्विटी जाधव, प्रा. राहूल ढगे व तंत्रसहाय्यक सिद्धेश्वर कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या