22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeलातूर५० वर्षांवरील व्यक्तींची होणार स्क्रिनिंग

५० वर्षांवरील व्यक्तींची होणार स्क्रिनिंग

एकमत ऑनलाईन

रेणापूर : लातूर जिल्हयात कोरोना विषाणुची लागण होऊन मरण पावलेल्या व्यक्ती ह्या ५० वर्षावरील असल्याचे आढळून आल्याने मृत्युचा दर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्वच गावातील १२८ बुथवर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ) यांच्या मार्फत मतदार यादीतील ५० वर्षावरील व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची आठवड्यातुन किमान एक वेळा स्क्रीनिंग मशीन तपासणी होऊन लक्षणे आढळून आल्यास त्या रुग्णास तातडीने रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात येणार आहे.

राज्यासह देशात कोरोना विषाणुने थैमान घातले असुन दिवसेंदिवस रुणाच्या संख्येत व मृत्याच्या प्रमाणात ही झपाटयाने वाढ होत आहे .कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शासना कडून विविध उपाययोजना राबविण्यत येत आहे. आरोग्य विभाग, पोलिस दल, सामाजिक संस्था आदिचा सहभाग महत्वाचा आहे. दरम्यान लातूर जिल्हयात कोरोना विषाणुने दिवसेंदिवस पाय पसरायला सुरुवात केली आहे.

रुग्ण संख्येत ही वाढ होत आहे़ तसेच विषाणुची लागण होऊन कांही रुग्णाचा ही मृत्यु झाला. मरण पावलेल्या व्यक्ती ह्या ५० वर्षावरील असल्याचे आढळून आल्याने मृत्युचा दर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अभियान हाती घेतले असुन या अभियाना अंतर्गत जिल्ह्यात मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या मार्फत मतदार यादीतील ५० वर्षावरील व्यक्तीचा घरोघर जाऊन शोध घेत त्यांची आठवड्यातुन किमान एक वेळा स्क्रीनिंग मशीनने ताप तर पल्स आॅक्सीमीटरने आॅक्सीजनचे प्रमाण तपासण्यात येणार आहे.

लक्षणे आढळून आल्यास त्या रुग्णास तातडीने रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. दरम्यान या अभियानातंर्गत तालुक्यात सर्वच गावातील १२८ बुथवर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या मार्फत मतदार यादीतील ५० वर्षावरील व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची आठवड्यातुन किमान एक वेळा स्क्रीनिंग मशीन तपासणी होणार आहे.

रेणापूर तहसील कार्यालयात बीएलओची बैठक
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार रेणापुरचे तहसीलदार राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि. २६ जून रोजी रेणापूर तहसील कार्यालयात तालुक्यातील बीएलओची बैठक संपन्न झाली. यात राबविण्यात येणाºया अभियानाबाबत माहिती देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वानी हे अभियान यशस्वी करावे़ तसेच केलेल्या कामाचा अहवाल तहसील कार्यालयास सादर करावा अशा सुचना तहसीलदार राहुल पाटील यांनी दिल्या.

नागरिकांनी माहिती न लपवता सहकार्य करावे
या अभियानात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आता बुथलेव्हल कोविड आॅफिसर म्हणुन काम करणार आहेत. पन्नास पेक्षा अधिक वयाच्या मतदारांचा शोध घेऊन त्यांची आशा कार्यकर्तीच्या साहयाने नियमित तपासणी करण्यात येणार आहे. अभियान यशस्वी करण्यसाठी नागरिकांनी माहिती न लपवता सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार राहूल पाटील यांनी केले.

Read More  हा खेळ आकड्यांचा.. ताळमेळ लागेना..!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या