24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरलातूरातील कोरोना बाधित क्षेत्र सील

लातूरातील कोरोना बाधित क्षेत्र सील

एकमत ऑनलाईन

भुसार लाईन, शहावली मोहल्ल्यात नव्याने आढळले रुग्ण

लातूर : प्रतिनिधी
शहरातील भुसार लाईन, शहावली मोहल्ला येथे शनिवारी रात्री नव्याने प्रत्येकी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे़ तसेच शहरापासून जवळच असलेल्या पाखरसांगवी येथील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ खाडगाव रोड येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील चौधरीनगरमधील तिघे पॉझिटीव्ह आल्याने शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोना पसरत आहे.

गंज गोलाई परिसरात असलेल्या भुसार लाईनमधील एकाचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटीव्ह आला आहे़ महानगरपालिकेच्या यंत्रणेने तात्काळ हा भाग सील केला आहे़ या भागात फवारणी करुन आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे़ शहावली मोहल्ला येथील एका ४७ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे़ या भागातही महानगरपालिकेने १६ घरांचा भाग सील केला आहे़ फवारणी करुन आरोग्य तपासणी सुरू केली आहे़ चौधरीनगरचा परिसरही सील करण्यात आला़ महापौर विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक युनूस मोमीन, तबरेज तांबोळी, अ‍ॅड़ सुमित खंडागळे, महेश कौळखैरे, राजू आवसकर, शहर अभियंता दिलीप चिद्रे, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे आदी उपस्थित होते. मनपाच्या अधिकाºयांनी या भागास भेट देऊन पाहणी केली़ कंटेन्मेंट झोनसाठी नोडल आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे़ कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना आता घरा बाहेर जाता येणार नाही आणि बाहेरुन कोणासही कंटेन्मेंट झोनमध्ये जाता येणार नाही़ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा महानगरालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहेत.

लातूर जिल्ह्यात शनिवारी तपासणी करण्यात आलेल्या एकुण ११२ स्वॅबपैकी ९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर पहिल्यांदाच एका ठिकाणी १३ जण पॉझिटीव्ह आले आहे आहेत़ येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एकुण ३९ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते़ त्यात चौघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत़ लताूरच्या स्त्री रुग्णालयातून पाच व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते़ त्यातील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ तसेच उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातून ३३ पैकी ५व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत़ यातील चार व्यक्ती या पुर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील असून हनुमाननगर येथे नव्याने कोरोना बाधित आढळला आहे़ जिल्ह्यात ११२ पैकी ९१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत़ एक अहवाल रद्द करण्यात आला आहे तर ७ अहवाल अनिर्णित आहेत़

मनपा आरोग्य विभागाची तत्परता
भुसार लाईन येथील बाधित व्यक्तीच्या परिवारातील काही सदस्यांना तातडीच्या उपचाराची गरज दिसून आल्याने मनपा आरोग्य विभागास कार्यरत करुन तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करवून घेण्यात आले.

Read More  राज्यात तपासणी लॅबची संख्या वाढविली : अमित विलासराव देशमुख यांची माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या