25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरक्रांतीनगर येथील परिसर सील,प्रशासनाच्या सुचना पाळा : मुन्ना पाटील

क्रांतीनगर येथील परिसर सील,प्रशासनाच्या सुचना पाळा : मुन्ना पाटील

एकमत ऑनलाईन

उदगीर : कोरोना हा संसर्गजन्य रोग ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असून याबाबत नागरिकांमध्ये फारशी जनजागृती नसल्यामुळे तालुक्यातील मलकापूर च्या नवीन वसाहत येथे क्रांतीनगर येथील परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांनी घरात रहा, सुरक्षित रहा असे आवाहन सभापती तसेच मलकापूर चे उपसरपंच सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी केले.

मलकापूरच्या नवीन वसाहतीमध्ये एका पाठ एक कोरोणाचा रुग्ण वाढत असल्याने ंिचतेचे वातावरण पसरले आहे. ज्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे त्या ठिकाणी पोलीस कमी संख्याबळा मुळे सतत पहारा शक्य नसल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसापासून मलकापूर गावातील नवीन वसाहतीमध्ये लागोपाठ कोरोना या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला असतानासुद्धा लोक बाहेर फिरत आहेत!जणु त्यांना सुतराम संबंध नसल्याचे दिसून येत आहे. मला करुणा झालाच नाही, मी का घरात बसू ?असे ते सांगतात. सध्या या कौरोणाचा शिरकाव एसटी कॉलनी पाठोपाठ क्रांतीनगर मध्ये सुद्धा झाल्याने नागरिकांनी दक्षता बाळगावी व प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे असेही आवाहन मुन्ना पाटील यांनी केले आहे.

क्रांतीनगर भागातील एका महिलेला कोरोणा पॉझिटिव झाल्याने तात्काळ त्या ठिकाणी मलकापूर चे उपसरपंच तथा बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित परिसर सिल करत कोरोना या रोगावर मात करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या दिसून आले.निर्जंतुकी करण्यासाठी संपुर्ण परिसर फवारणी करण्यात आली यावेळी उपसरपंच तथा सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ बिरादार, शेख मेहबूब ,ग्राम विकास अधिकारी निळकंठ पटवारी सहाय्यक शिवराज ब्रह्मंना तसेच पंचायत चे कर्मचारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Read More  दुधाला सरसकट प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्या

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या