30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home लातूर ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत शहरात १४७ कोरोनाबाधितांचा शोध

‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत शहरात १४७ कोरोनाबाधितांचा शोध

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरात राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत १४७ कोरोनाबाधितांचा शोध घेण्यात महापालिकेच्या यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात एकत्रीत यादी तयार करुन ‘वन-टू-वन’ फोकस करण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आखले जात आहे.

लातूर शहरात महापालिकेच्या वतीने १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर अशा दोन टप्प्यांत ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’, ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत महापालिकेने आशा स्वयंसेविकांचे १२७ पथके नेमण्यात आले आहेत. या पथकांनी शहातील ८५ हजार २१८ कुटूंबांपर्यंत पोहोचून ३ लाख ८४ हजार ७०३ नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलीत केली. घरोघरी जाऊन ताप आणि प्राणवायू (ऑक्सिजन)ची तपासणी करण्यात आली. तसेच नागरिकांना आरोग्य शिक्षण आणि आरोग्यावियषक महत्वाचे संदेश देणे, संशयीत कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा, मधुमेहाचे ६० हजार २०९, मूत्रपिंड विकाराचे २४९, हायपरटेन्शनचे ९ हजार ८२, लिव्हरचे १४८ यासह -हदयरोग, कर्करोग आदी गंभीर आजाचे ८०० रुग्णांचा शोध घेण्याता आला.

या मोहिमेअंतर्गत पहिल्या फे रीत प्रत्येक घरात जाण्यापूर्वी दाराबाहेर सोयीच्या ठिकाणी स्टिकर लावले गेले. घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक सदस्याची अ‍ॅपमध्ये नोंद घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येकांची ताप आणि प्राणवायूची तपासणी करण्यात आली. ताप असलेली व्यक्ती आढळल्यास (तापमान ९८.६ एफ) अशा व्यक्तीस खोकला, घशात दुखणे, थकवा इत्यादी लक्षणे आहेत याची माहिती घेण्यात आली. घरातील प्रत्येकास मधुमेह, -हदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण दमा इत्यादी आजार आहे का? याबाबत विचारणा करण्यात आली आणि दिलेल्या उत्तरानूसार अ‍ॅपमध्ये माहिती नोंदविण्यात आली. रुग्णास सारी, आयएलआय लक्षणे असल्यास फिव्हर क्लिनीकमध्ये संदर्भीत करण्यात आले.

दुस-या फेरीत दररोजी ७५ ते १०० घरांपर्यंत पोहोचण्यात आले. सर्वाचे तापमान व प्राणवायू मोजून दरम्यानच्या काळात घरातील कोणाला मोठा आजार होऊन गेला काय याची खात्री करण्यात आली. पुन्हा एकदा आरोग्य संदेश देण्यात आला. ताप १००.४ फॅ रनहरिट पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास आणि प्राणवायू ९४ टक्के पेक्षा कमी असल्यास रुग्णास संदर्भीत करण्यात आले. पहिल्या फेरीच्या वेळी गैरहजर असणा-या घरातील व्यक्तींची को-मॉर्बिलीटी कंडीशनसाठी चौकशी करण्यात आली.

वेगवेगळया क्षेत्रात काम करताना तडजोडीसोबत आंनद कसा लुटायचा हे माणिक आईंनी शिकवले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या