37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeलातूरअलगरवाडीला व्दितीय तर उटी (बु) ला तृतीय पुरस्कार

अलगरवाडीला व्दितीय तर उटी (बु) ला तृतीय पुरस्कार

एकमत ऑनलाईन

लातूर : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१९-२० च्या औरंगाबाद विभागस्तरीय स्पर्धेत जिल्हयातील अलगरवाडी (ता. चाकूर) या ग्रामपंचायतीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभाग स्तरीय व्दितीय क्रमांक तर ग्रामपंचायत उटी (बु) ता. औसा या ग्रामपंचायतीस विभाग स्तरीय तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान,जीवन स्तर उंचाविण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणा-या अभियान/कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यपूर्ण सहभाग असावा व कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्त्व पटवून देण्याकरिता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबव्ण्यििात येत आहे.त्यात स्वच्छतेशी व ग्रामविकासाशी निगडीत क्षेत्रामध्ये भरीव काम करणा-या ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रभागस्तर,जल्हिा परिषद गट स्तर,जिल्हास्तर,विभागस्तर व राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल (भा.प्र.से.) आणि पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ७८५ ग्रामपंचायतींनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१९-२० च्या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या त्यात अलगरवाडी ता. चाकूर आणि उटी बु ता. औसा या ग्रामपंचायतीस जिल्हास्तरावर अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक जाहीर केल्याने, या गावांची मा.विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचे अध्यक्षतेखाली नियुक्त विभाग स्तरीय तपासणी पथकातील उपायुक्त (विकास) अनिलकुमार नवाळे व पथक सदस्य यांनी पाहणी केली होती.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विभागस्तरावर अलगरवाडी ता. चाकूर आणि उटी बु ता. औसा या ग्रामपंचायतींनी यश संपादन केल्याने सर्व पदाधिकारी, तालुक्याचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं.), जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, गट समन्वयक (पाणी व स्वच्छता), गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती व ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल (भा.प्र.से.) उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी अभिनंदन केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या