लातूर : यशस्वी वकील व्हायचे असेल तर लिहीणे, बोलणे व्यवस्थापन ईत्यादी मुलभूत कौशल्ये अंगीकारणे आवश्यक आहे. लिहीणे व बोलण्याचा विकास करायचा असेल तर व्यक्त व्हायच्या किंवा करायच्या भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. वकीलाने आपल्या अशीलाची पार्श्वभुमी जाणून घेऊन केस फाईल केली तर यशाचा आलेख चढता राहील. त्यासाठी वकीलाने व्यावसायिक असण्यासोबतच सामाजिक असले पाहिजे. वकीलांना आपल्या यशाची व्याख्या स्वत: करता आली पाहिजे असे मत अॅड. नित्यानंदन बालगोपालन यांनी व्यक्त केले.
येथील दयानंद विधी महाविदयालयात आयोजित एक दिवशीय ‘यशस्वी वकील होण्यासाठी प्रात्यक्षिक कौशल्ये’ या वेबीनारमध्ये अॅड. बालगोपालन बोलत होते. वकीली व्यवसायात यशस्वी होण्यासाठीची प्रात्यक्षिक कौशल्ये आत्मसात करावयाची असतील तर स्वयंशिस्तीची दिनचर्या अवलंबावी लागेल. त्यात सकाळी लवकर ऊठण्यापासून रात्री झोपेपर्यंत वकीली व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय करावे व काय करु नये तसेच वाचन, लिखाण, कायदयाचा अभ्यास, स्वत:च्या सवयी, पुढे जाण्यासाठी संधी शोधणे, मेहनत करणे हया सवयी यशाच्या मुकुटात मानाचा तुरा कसा खोवतात याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. इंग्रजी बाराखडीचा प्रत्येक शब्द वकीलाच्या यशाच्या पायरीशी कसा संबंधित आहे हे त्यांनी विविध उदाहरणांच्या आधारे समजावून सांगितले. अंगीकारायच्या सवयी व मोह टाळावयाच्या सवयी ओळखण्याचे कौशल्य वकीलांनी आत्मसात केले तर वकील हा समाजासाठी निष्पक्षपणे न्यायदानाचे साधन बनू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. पुनम नाथानी यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. शुभांगी पांचाळ यांनी केले. यावेळी दयानंद विधी महाविदयालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी मायक्रोसॉफ्ट टीमच्या सहाय्याने या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला.
सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडती लवकरच काढणार ! -हसन मुश्रीफ