25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home लातूर १० युवकांचे स्वंय स्फूर्तीने प्लाझ्मा दान

१० युवकांचे स्वंय स्फूर्तीने प्लाझ्मा दान

एकमत ऑनलाईन

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे कोवीड-१९ प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील अहमदपूर येथील- ६, सारोळा -२, उदगीर- १ व लातूर येथील -१ अशा एकूण १० युवकांनी स्वंय स्फूर्तीने प्लाझ्मा दान करुन कोवीड-१९ अतिगंभीर रुग्णांना आशेचा किरण मिळवून दिला.

प्लाझ्मा दात्यांना कसलाही धोका होत नाही ज्या पद्धतीने आपण रक्तदान करतो त्याही पेक्षा सोपीपद्धत प्लाझ्मा दानाची आहे. त्यामुळे आतापर्यंत प्लाझमा दान केलेल्या कोविड योद्धांना कसलाही त्रास झाला नाही. आज तागायत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे १३ दात्यांनी स्वयंस्फूर्तीने प्लाझ्मा दान केले असून प्लाझ्मा दाते स्वच्छेने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी ओळखून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान करण्यास दात्यांचे सहकार्य मिळत आहे.

मी आता कोरोना आजारातून बरा झालो आहे आणि पुन्हा काही तरी होईल, अशा भीतीपोटी न राहता कोविड-१९ आजारातून बरे झालेल्या दात्यांनी स्वत:हून प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे त्यामुळे अति गंभीर व मध्यम प्रकारची लक्षणे असणा-या कोरोना बाधित रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होईल, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे यांनी केले.

या वेळी उपअधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, उप अधिष्ठाता जनसंपर्क, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, कोरोना नोडल ऑफिसर डॉ. मारुती कराळे, डॉ. उमेश कानडे, सुरेश चौरे, रक्तपेढी प्रमुख डॉ. के. टी. दळवे, डॉ. अजय ओव्हाळ, डॉ. अनिल मुंडे, डॉ. आशिष चेपुरे, मनोविकारशास्त्र प्रमुख डॉ. पवार, डॉ. दीप्ती सोनवणे, प्रशासकीय अधिकारी मगर यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेंद्र सूर्यवंशी समाजसेवा अधीक्षक श्रीमती मीरा पाटील गिरीश मुसांडे. तिडके स्वामी यांनी परिश्रम घेतले.

लातूर जिल्हा बँकेत ७५ कर्मचा-यांनी केले रक्तदान
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे मार्गदर्शक विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ८ व्या स्मृतिदिनी दिनानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी बँकेच्या मुख्यालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुरक्षित अंतर ठेऊन बँकेच्या ७५ अधिकारी, कर्मचारी व गटसचिव यानी रक्तदान केले.

तत्पूर्वी विकासरत्न विलासराव देशमुख यांना बँकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. श्रीपतराव काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन एस. आर. देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्विराज सिरसाठ, संचालक नाथसिंह देशमुख, अ‍ॅड. प्रमोद जाधव, संभाजीराव सुळ, सुधाकरराव रुकमे, संचालिका स्वयंप्रभा पाटील, शिवकन्या पिंपळे, कार्यकारी संचालक हनमंतराव जाधव, श्रीकांत सोनवणे, मधुकर गुंजकर, पत्रकार हरिराम कुलकर्णी, अ‍ॅड. श्रीरंग दाताळ यांची उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात जिल्हा बँक कर्मचारी, अधिकारी, गटसचिव संघटनेचे पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन यानी सहभाग नोंदवला.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे सरव्यवस्थापक सी. एन. उगिले, उपसरव्यवस्थापक तानाजी जाधव, बी. व्ही. पवार, आस्थापना व्यवस्थापक बी. एस. सांगवे, येरटे, व्ही. जी. शिंदे, आर. ए. देशमुख, आनंत तांदळे, पाटील तसेच माऊली ब्लड बँकेचे डॉ. उमाकांत जाधव, डॉ. आर्फान टाके, सोमनाथ बुरबुरे, गटसचिव संघटनेचे धोंडीराम पौळ, शिवशंकर कचवे, तानाजी शिंदे, वैजनाथ चवळे, गोरे, सुनिल पाटील यांनी सहकार्य केले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या