लातूर : प्रतिनिधी
येथील सहकारी औद्योगिक वसाहतीचे संस्थापक चेअरमन स्व. रामगोपाल राठी यांच्या तैलचित्राचे अणावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन अशोक लोया, व्हाईस चेअरमन अभय शहा, रमेश भूतडा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास लातूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन सांगवे, रमेश राठी, दिलीप माने, गोविंद पारीख, विजय केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेही कृष्णा बियाणी, श्रद्धा बियाणी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक रमेश भूतडा यांनी केले. यावेळी रमेश राठी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राहूल राठी, समीर राठी, राठी कुटूंबिय, गर्जे, अॅड. ब्याळे, भूतडा, वाय. एस. मशायक, नवनीत भंडारी, पिंटू मार्डीकर, विठ्ठलराव चिकटे, प्रकाश कासट यांच्यासह व्यापारी, उद्योजक, नागरिक उपस्थित होते.