26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home लातूर सीरमची कोरोना लस लातूरात दाखल

सीरमची कोरोना लस लातूरात दाखल

एकमत ऑनलाईन

लातूर : संपूर्ण लातूरकरांचे लक्ष लागलेल्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड ही कोरोनाची लस दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी लातूर शहरात आली. ‘कोविशिल्ड’च्या २० हजार कुप्यांचा पहिला टप्पा आला असून दि. १६ जानेवारीपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु करण्यात येणार आहे. पुणे येथील सीरम इन्स्टिीट्यूटमधून ‘कोविशिल्ड’ लस घेऊन व्हॅन बुधवारी सकाळी निघाली. दुपारी बीडला पोहंचली आणि सायंकाळी लातूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात ही व्हॅन पोहोचली. आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. श्रीधर पाठक व त्यांच्या सहकार्याच्या उपस्थितीत लातूर जिल्ह्यासाठी आलेल्या ‘कोविशिल्ड’च्या २० हजार कुप्यांच्या पहिला टप्पा उतरवून घेऊन तो आरोग्य उपसंचालक कार्यालयातील स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला. तेथून या लसी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या स्टोरेज ठेवण्यात येतील आणि तेथून लसीकरण करण्यात येणा-या जिल्ह्यातील आठ केंद्रांना या लसी पाठविल्या जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात दि. १६ जानेवारी रोजी आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचा-यांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी १७ हजार ३८० कर्मचा-यांची नोंदणी करण्यात आली आहे. दिवसाला एका केंद्रावर १०० व्यक्तींनाच लस देण्याची सोय करण्यात अली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील शासकीय व खाजगी कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुस-या टप्प्यात नागरिकांना लस दिली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख यांनी सांगीतले. ५० वर्षाच्या पूढील आणि अन्य आजार असलेल्या नागरिकांना दुस-या टप्प्यात लस देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप निर्देश नाहीत. मार्गदर्शक सूचना आल्यानंतर दुस-या टप्प्यातील लसीकरणाबाबत ठरविले जाईल, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिम राबविण्यासाठी प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नावाची पडताळणी करण्यासाठी एक, लस देण्यासाठी एक, व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी दोघे आणि सुरक्षा रक्षक म्हणून एक, असे पाच कर्मचारी लसीकरण केंद्रावर असणार आहेत.

फ्रं ट लाईन कर्मचा-यांना शनिवारी लसीकरण
गेल्या चार-पाच महिन्यांनापासून कोरोना लसीबाबत चर्चा होती. सीरमची ‘कोविशिल्ड’ लस तयार झाली. या लसीच्या चाचण्या झाल्या आणि लसीला अंतीम स्वरुप आले. आला ही लस कधी येईल याची प्रतिक्षा सर्वांनाच होती. दि. १२ जानेवारी रोजी सीरमकडून ‘कोविशिल्ड’ ही लस विधीवत संपुर्ण देशभरात पोहोचविण्यास प्रारंभ झाला, परंतु ही लस लातूरला कधी येईल यांची प्रतिक्षा होती. बुधवारी सायंकाळी ‘कोविशिल्ड’ लसीचे लातूरात आगमन झाले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शनिवार दि. १६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील निश्चित केलेल्या आठ केंद्रावर फ्रं ट लाईन कर्मचा-यांना म्हणजे सरकारी आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, लॅब टेक्निशियन, आरोग्य सेवेशी संबंधीत इतर कर्मचा-यांना दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख यांनी दिली.

या आठ केंद्रावर होणार लसीकरण
-विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था,
-एमआयटी वैद्यकीय महाविद्यालय, ४विवेकानंद रुग्णालय,
-उप जिल्हा रुग्णालय उदगीर, ४ग्रामीण रुग्णालय अहमदपूर,
-उप जिल्हा रुग्णालय निलंगा, ४ग्रामीण रुग्णालय औसा,
-ग्रामीण रुग्णालय मुरुड या आठ केंद्रांवर लसीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या