34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरगर्भाशयातच तिळ्यांचे जुळे

गर्भाशयातच तिळ्यांचे जुळे

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील सुप्रसिद्ध के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी सेंटरमध्ये नेहमीच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन वंध्य रुग्णावर यशस्वीपणे उपचार केला जातो. नूकतेच एका वंध्य रुग्णाला आयव्हीएफ तंत्राद्वारे तिळे बाळाची गर्भधारणा झाली. तिळे बाळांचे गर्भाशयातच एम्ब्रियो रिडक्शनद्वारे जुळे करण्यात आले. याविषयी सुप्रसिद्ध वंध्यतज्ज्ञ डॉ. आमिर शेख म्हणाले, एम्ब्रियो रिडक्शन ही अत्याधुनिक सेवा आता के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उपलब्ध आहे. आयव्हीएफ तंत्राद्वारे रुग्णाचे भ्रुण मातेच्या गर्भाशयात सोडल्यानंतर अंदाजे आठ ते दहा आठवड्यांमध्ये किती जीवंत बाळांची गर्भधारणा झाली.

याची सोनोग्राफीद्वारे खात्री केली जाते. जर गर्भाशयात तिळ्यांची गर्भधारणा झाली असेल तर यामधील एक गर्भ कमी केला जातो. म्हणजेच रिडक्शन केला जातो. तसेच जर मातेच्या गर्भाशयातील जुळे बाळ वाढण्याची क्षमता नसेल तर जुळ्या बाळांपैकी एका बाळाला कमी केले जाते. यामध्य चिरफाड, टाके वगैरे इतर शस्त्रक्रिया नसतात. यामुळे ही अतिश्य सोपी कमी त्रासदायक उपचार पद्धती आहे. मातेला थोडीशी भूल देऊन सोनोग्राफीने बाळाची स्थिती बघितली जाते. यानंतर बारीक केसासारख्या सुईद्वारे गर्भाशयातील भ्रुणमध्ये एक औषध सोडले जाते. त्यामुळे त्या भ्रुणाची वाढ होत नाही. काही दिवसांनी हे आपोआप कमीकमी होऊन पूर्णत: नाहिसे होते. मातेला पुढे दोन दिवस निरीक्षणाखाली ठेऊन घरी पाठविण्यात येते. अशा प्रकारे गर्भाशयातच कुठलीही शस्त्रक्रिया न करता भ्रुण कमी केला जातो.

के. जी. एन. टेस्ट ट्युब बेबी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. रझिया शेख म्हणाल्या, एकतर वंध्यत्वाचे रुग्ण हे मानसिकरित्या खचलेले असतात. त्यामध्ये जर त्यांना गर्भधारणा झाल्यावर एम्ब्रियो रिडक्शनची वेळ आल्यास त्यांना प्रचंड मानसीक त्रास होतो. अशावेळेस मुंबई, पुणे अशा अनोळखी ठिकाणी जाऊन हे करणे आणि गर्भपाताचा संभाव्य धोका पत्करुन या बाबी पूर्ण करणे त्यांना खुपच अवघड वाटते. याबाबींचा विचार करुन डॉ. आमिर शेख यांनी लातूरमध्येच ही सुविधा उपलब्ध करुन रुग्णाचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

तब्बल ४४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गायरान पट्ट्याचे सातबारात रूपांतर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या