26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरलातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारा

लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईनची तातडीने उभारणी करण्यात यावी, अशी मागणी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत केली आहे. लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईनची व्यवस्था नसल्याने नवीन रेल्वे गाड्या सुरुवात करणे आणि प्रवाश्यांना सेवा सुविधा देण्यात अडचणीत येत आहेत. त्यामुळे तातडीने पिट लाईनच्या उभारणीला मान्यता द्यावी, याकडे खासदार शृंगारे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

लातूर रेल्वे स्टेशनवरुन जेव्हा जेंव्हा नवीन गाडी सुरु करण्याची मागणी करण्यात येते तेंव्हा स्टेशनवर आवश्यक त्या सुविधा नसल्याचे कारण सांगण्यात येते, त्यामुळे अनेक वर्षांपासून काही नवीन मागणी करण्यात येणा-या रेल्वे गाड्या सुरुवात झालेल्या नाहीत. लातूरला आता मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी झालेली आहे. त्याचबरोबर लातूर रेल्वे स्टेशनवरुन ये-जा करणा-या प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सामान आणि माल वाहतूकही वाढलेली आहे. विशेष म्हणजे लातूरसह मराठवाड्यातील जनतेला देशाच्या विविध शहरांशी जोडण्या संबंधाने नवीन रेल्वे गाड्या सुरुवात होणे गरजेचे आहे. हेही खासदार सुधाकर शृंगारे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले आहे.

लोकसभेत बोलताना खासदारांनी नियम -३७७ अंतर्गत पिट लाईनचा मुद्दा उपस्थित करुन लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन झाल्यास मराठवाड्याला जोडणा-या अनेक रेल्वे गाड्या सुरुवात करणे शक्य होणार असून प्रवाश्यांनाही जास्तीत जास्त सुविधा देणे शक्य होणार आहे. मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीची १२३ वी बैठक नुकतीच मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही पिट लाईन आणि इतर प्रवासी सुविधा देण्या बाबत महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी अनुकलता दर्शविल्याचे सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना यांनी कळवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या