जळकोट : जळकोट तालुक्यात कोरोनाच्या कालावधीत कुठलीही भीती न बाळगता चोवीस तास काम करणा-या पोलीस कर्मचा-यांनाही आता कोरोना महामारीनेही गाठले आहे. ठाण्यांमधील तब्बल सात कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे तसेच पत्नीच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीलाही कोरोनाची लागण झाली आहे. याव्यतिरिक्त एका होमगार्डलाही कोरोनाची लागण झाली आहे.
जळकोट तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे, आजपर्यंत विविध शासकीय कार्यालय बँका दुकाने, तसेच ग्रामीण भागामध्ये कोणाचा प्रसार झाला होता परंतु कोरोनाची काळजी घ्या, तोंडाला मास्क बांधा, असे वारंवार सांगून कोरोनाबाबतीत जनतेला सतर्क करण्याचे काम जळकोट पोलीस करीत होते.
गत तीन महिन्यांच्या कालावधीत पोलीस ठाण्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता परंतु आता मात्र अनेक पोलिसांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाली आहे. तसेच रावणकोळा तांडा येथील पत्नीचा खून प्रकरणातील आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या आरोपीला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
एकाच वेळी अनेकांना पोलीस ठाण्यात कोरोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या पोलिस कर्मचा-यांच्या संपर्कात आलेल्या नी खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच जळकोट तालुक्यात माळहिप्परगा, वांजरवाडा, पाटोदा या ठिकाणी प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे.
‘तर’ मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती