24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home लातूर लातूर शहरासाठी ‘कोविशिल्ड’च्या सात हजार कुप्या

लातूर शहरासाठी ‘कोविशिल्ड’च्या सात हजार कुप्या

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार लातूर शहरात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी लातूर शहर महानगरपालिका सज्ज झाली आहे. शनिवार दि. १६ जानेवारी रोजी होणा-या लसीकरणासाठी लातूर शहराला ‘कोविशिल्ड’ चे ७०० वायल म्हणजेच सात हजार कुप्या प्राप्त झाल्या आहेत. या कुप्या येथील पटेल चौकातील महानगरपलिकेच्या दवाखान्यातील शितसाखळी कक्षामध्ये +२ ते + ८ डिग्री सेल्सीअस तापमानात ठेवण्यात आलेल्या आहेत.

गेल्या वर्षभरात कोरोना विषाणुच्या विळख्यात संपूर्ण देश आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन सुचनांनूसार फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर, अनावश्यक गर्दी टाळणे हे उपाय सांगीतले गेले. त्यानूसार सर्वचजन या सूचनांची अंमलबजबावणी करीत आहेत. कोविड-१० प्रतिबंधक लस आज येणार, उद्या येणार अशाी चर्चा सुरु झाली. त्यामुळे ही लस कधी येईल याची सर्वांना प्रतिक्षा होती. अखेर दि. १३ जानेवारी रोजी सीरम इन्स्टट्युट ऑफ इंडिया, पुणे येथून ‘कोविशिल्ड’ लस प्राप्त झाली.

कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लातूर शहरातील महानगरपालिका व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस स्टॉप ३ हजार ९११ व शासनाच्या रुग्णालयातील २ हजार ७६७ असे एकुण ६ हजार ७११ जणांना शनिवारी लस दिली जाणार आहे. लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था या एकच केंद्रावर एका दिवसात शंभर जणांना लस दिली जाणार आहे. त्याकरीता लातूर शहरासाठी ‘कोविशिल्ड’ चे ७०० वायल म्हणजेच सात हजार कुप्या प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिम राबविण्यासाठी प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नावाची पडताळणी करण्यासाठी एक, लस देण्यासाठी एक, व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी दोघे आणि सुरक्षा रक्षक म्हणून एक, असे पाच कर्मचारी लसीकरण केंद्रावर असणार आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील सहा केंद्रावर होणार लसीकरण
पहिल्या टप्प्याचे लसीकरण विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, एमआयटी वैद्यकीय महाविद्यालय, उप जिल्हा रुग्णालय उदगीर, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय औसा, ग्रामीण रुग्णालय मुरुड या सहा केंद्रांवर होणार आहे. गोर्व्हमेंट ऑफ इंडिया वेल्फेअर डिपार्टमेंटच्या वतीने प्रारंभी लसीकरणसाठी लातूर जिल्ह्यातील ११ केंद्रांना मंजूरी देण्यात आलेली होती. त्यानंतर ३ केंद्र कमी करुन ८ केंद्रांना मंजूरी दिली गेली. परंत त्यात सूधारणा करुन जिल्ह्यातील उपरोक्त ६ केंद्रांना मंजूरी देण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण प्रायोगीक तत्वावर असल्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. असे असले तरी दुस-या टप्प्यात सर्वच केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी सांगीतले.

नांदेडला कोरोना प्रतिबंधक लसीचे १७३३० डोस मिळाले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या