24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरदेवणी तालुक्यात सात-बारा संगणकीकरण पूर्णत्वाकडे

देवणी तालुक्यात सात-बारा संगणकीकरण पूर्णत्वाकडे

एकमत ऑनलाईन

देवणी (अन्वरखाँ पठाण) : देवणी तालुक्यातील महसूल विभागाच्या वतीने सुरू असलेले सात-बारा संगणकावरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठ दिवसात देवणी तालुक्यातील सातबारा संगणकीकरणाचे काम पुर्ण होणार असल्याचे संकेत रविवारी दि.२५ जुलै रोजी देवणी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिले.

देवणी तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सातबारा संगणकीकरणाचे काम सुरू आहे. हस्तलिखित सातबारा व संगणकीकरण सातबारा याचा अचूक मेळ घालण्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. व एक टक्का काम शिल्लक राहिले आहे. हे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल.

राहिलेला एक टक्का काम क्लीष्ट असून सातबारा जुळविण्यासाठी लागवडीलायक क्षेत्र व खातेदारांचे क्षेत्र यांचा ताळमेळ जुळणे/ सातबाराचे क्षेत्र जुळणे गाव नमुना नंबर १ शी आवश्यक असते. सोप्या प्रकरणात एकतर्फी कारवाई केली जाते परंतु जिथे खातेदाराच्या हितावर परिणाम होईल तिथे खातेदारांनी मोजणी अर्ज करणे आवश्यक आहे. पण खातेदार अर्ज करीत नसल्यामुळे काम प्रलंबित आहे.

कमी-अधिक क्षेत्र असणा-यांनी तातडीने संपर्क साधावा
देवणी तालुक्यात केवळ १४ सातबाराचे काम शिल्लक राहिले आहे. सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून काम सुरूआहे. सातबारा संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ज्या शेतक-यांच्या सातबारामधील क्षेत्र कमी-अधिक आहे, त्यांनी जर तातडीने संपर्क साधला तर आठ दिवसांत हे काम पूर्ण होऊ शकते. अशी माहिती देवणी तहसीलदार -सुरेश घोळवे यांनी दिली.

भारतमाला योजनेतील अक्कलकोट ते सोलापूर रस्ता ८४% पूर्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या