24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरमोठ्या बांधकामांना मलनि:स्सारण प्रकल्प अनिवार्य

मोठ्या बांधकामांना मलनि:स्सारण प्रकल्प अनिवार्य

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण पूरक इमारत बांधकाम क्षेत्रासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार मोठी बांधकामे आणि विविध आस्थापना व संस्थांना मलनि:स्सारण प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे.

राज्य शासन व हरित लवादाच्या आदेशानुसार यापुढे १० खाटांच्या वरील दवाखाने, १०० चौरस मीटर पेक्षा अधिक बांधकाम असणारी मंगल कार्यालये, २५ पेक्षा अधिक बेड असणारे हॉटेल व लॉंिजग, गोशाळा, शाळा व महाविद्यालये, ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी असणारे कोचिंग क्लासेस, तीनशेहून अधिक आसनक्षमता असणारे चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, अपार्टमेंट यांना आता मलनि:स्सारण प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे.

नव्याने बांधकाम होत असेलकिंवा यापूर्वी अशा संस्थाकिंवा आस्थापना कार्यरत असतील या दोघांसाठीही मलनि:स्सारण प्रकल्प अनिवार्य आहे. अशा संस्थांनी लवकरात लवकर त्याचे बांधकाम करून घ्यायचे आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेऊन दि. २५ ऑगस्टपर्यंत ते महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाहरकत गरजेचे
संबंधितांनी मलनि:स्सारण प्रकल्प उभारल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेऊन ते महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहे.

वीज, पाण्याच्या वापरात बचत तर कचरा कमी होणार
विविध विकासकामांमुळे बांधकाम क्षेत्र वाढत असून त्यात नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर व हरितगृह वायू उत्सर्जनात संतुलन साधण्यासाठी पर्यावरण पूरक इमारत बांधकाम क्षेत्रासाठी राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे ऊर्जा वापरात २० ते ३० टक्के तर पाणी वापरामध्ये १५ ते २० टक्के बचत होणे अपेक्षित आहे. यासोबतच कच-याचे प्रमाणही कमी होणार आहे.

शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात, राज्यमंत्रीमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या