23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरशहीद जवान अमर रहे...

शहीद जवान अमर रहे…

एकमत ऑनलाईन

लातूर : २६ जुलै या दिवशी आपल्या देशाच्या इतिहासात घडलेल्या सर्वात मोठ्या घटनेचा दिवस म्हणजे कारगिल युद्ध. हा दिवस आपल्या देशात कारगिल विजय दिवस साजरा म्हणून करण्यात येतो तसेच कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना समर्पित असलेला असा हा दिवस म्हणून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलातील शहीद जवान स्मारक येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ‘शहीद जवान अमर रहे…’, या घोषणेने सारा आसमंत दुमदूमून गेला.

कारगिल युद्धात शहिद भारतीयांसाठी विजय दिवस आहे. भारतीय जवानांनी या युद्धात दाखवलेले शौर्य अद्वितीय आहे. शत्रु सैन्यासोबत निकराचा लढा देऊन भारत मातेच्या रक्षणासाठी असंख्या शुरविरांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. त्यांच्या प्रति तमाम भारतीय नतमस्तक आहेत. लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलातील अमर जवान ज्योतीस्थळी कार्यक्रमा आयोजित करुन भारतीय शुरवीर शहीद जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी पक्षाच्या पदाधिका-यांसोबत कारगिल विजय दिनानिमित्तश्र शहीद वीर
जवान लेफ्टनंट कृष्णकांत कुलकर्णी यांच्या वीरमाता यांना पुष्गुच्छ देवून सन्मान करून आशीर्वाद घेतला.

याप्रसंगी महेश काळे, दगडुअप्पा मिटकरी, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, प्रवीण सूर्यवंशी, जब्बार पठाण, बाळासाहेब देशमुख, अ‍ॅड. प्रदीपसिंह गंगणे, प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. एम. पी. देशमुख, चंद्रकांत धायगुडे, प्रा. संजय जगताप, बिभीषण सांगवीकर, अजीज बागवान, आसिफ बागवान, यशपाल कांबळे, राहुल दुमणे, पप्पू घोलप, संजय सूर्यवंशी, इसरार सगरे, कल्पनाताई मोरे, सुलेखा कारेपूरकर, कुणाल वागज, अभिषेक पतंगे, अभिजित इगे, जहिर शेख, विजय धन्ना, अजय मोरे, अ‍ॅड. सचिन पंचाक्षरी, करीम तांबोळी, राजू गवळी, विकास कांबळे, बप्पा मार्डीकर, रणधीर सुरवसे, गोविंद केंद्रे, अ‍ॅड. बाबा पठाण, धनंजय शेळके आदी उपस्थित होते.

कारगिल विजयी दिनादिवशी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा
महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी कारगिल विजय दिनी दिवशी लातूर शहरात लातूर वृक्ष चळवळीच्या माध्यमातून न्यु आदर्श कॉलनी येथे लावलेल्या १०० वृक्षांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप , डॉ. बी. आर. पाटील, प्रा. दशरथ भिसे, नरेश पाटील, राजेश पाटील, सी. बी. कुलकर्णी, सुनील देशपांडे, पी. एम. पाटील, सुभाष खंदाडे, नेताजी जाधव, अनिल जाधव, रामराम भोसले, गोपाळ बाहेती, दिपिकेत पुरी ,चंद्रशेखर देसाई, सागर अबदागिरे , शिरीष उटगे, प्रशांत ढमाले, डॉ. शैलेश पडगिलवार, सचिन उटगे, गिरीश उटगे उपस्थित होते.

उध्दवराव, ६१व्या वाढदिवसाचे अभिनंदन….

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या