27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरशिरुर ताजबंद मराठा समाजाचे घंटानाद आंदोलन

शिरुर ताजबंद मराठा समाजाचे घंटानाद आंदोलन

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षणाचे फायदे मिळावे ,महाराष्ट्रातील खासदार ,आमदार यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले, दि.१७ सप्टेंबर रोजी शिरुर ताजबंद येथील आमदार बाबासाहेब पाटील यांच्या इंद्रायनी निवास्थानी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्याविषयीच्या भावना सरकारकडे पोंहचविणार असून या आंदोलनात मी तुमच्या सोबत असल्याचे सांगीतले.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या कारणांमुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे मराठा समाजाने आमदार बाबासाहेब पाटील यांच्या इद्रायणी निवासस्थानी घंटानाद आंदोलन केले. आमदार पाटील यांच्या घरासमोर एक मराठा लाख मराठा, आंदोलन करताना मराठा समाजातील कांही मुलांवर गुन्हे दाखले केले. गुन्हे मागे घेण्यात यावे, मराठा मुलांनी कुठे दरोडा अथवा शासकीय मालमत्तेचे नुकसान केलेले नाही ते राजकीय स्वरुपाचे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. सारथी संस्थेला भरीव आर्थिक मदत करावी, यावर्षी उच्च शिक्षण घेणा-या मराठा समाजाचे शूल्क आरक्षणाचा निकाल येईपर्यंत शासनाने भरावे. मराठा समाजाच्या मुलांना न्याय देण्यासाठी त्वरित अध्यादेश काढण्यात यावा, महाराष्ट्र शासनाने वेळीच लक्ष दिले असते तर मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती व अन्य मागण्याविषयीचे निवेदन यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांना देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच आमदार बाबासाहेब पाटील यांनी शासनाला अध्यादेश काढण्याविषयी निवेदन देऊन कळविल्याबद्दल महाराष्ट्रातील पहिले आमदार मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घेतला म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने आमदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी मराठासेवा संघाचे जल्हिा उपाध्यक्ष गोंिवद शेळके, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष, गजानन माने,जिल्हाध्यक्ष नामदेव ढोकळे,जिपचे गटनेते मंचकराव पाटील, जि.प.सदस्य माधवराव जाधव,बबन हांडे,प्रा.रोहीदास कदम,विक्रम भोसले, ग्राम पंचायत सदस्य, काना कापशे, प्रशांत भोसले, सुधीर गोरटे,शंकर मुळे,शिवराज चोतवे, मुकेश पाटील,विनोद माने,गंगाधर ताडमे, अमोल देशमुख, गोपाळ कानवटे, शिवाजी कापसे, रामकिशन पडोळे, पाटील, आनंद जाधव, नरंिसग भातांब्रे सह अहमदपूर,चाकुर तालुक्यातील सकल मराठा बांधव उपस्थित होते.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन संपूर्ण सहकार्य करेल ! – उदय सामंत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या