27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरनीट-युजी परीक्षेत शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे यश

नीट-युजी परीक्षेत शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे यश

एकमत ऑनलाईन

लातूर : नीट-युजी-२०२२ परीक्षेत शिव छत्रपती शिक्षण संस्थेअंतर्गत राजर्षी शाहू महाविद्यालय व संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल या दोन्ही महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. श्रुती संजय वीर ६९० गुण मिळवून महाविद्यालयातून व मुलीतून सर्वप्रथम आली आहे. सौरभ माधव महाडिक ६७६ गुण प्राप्त करून महाविद्यालयातून सर्वद्वितीय व जनरल ईडब्ल्युएस संवर्गातून प्रथम, अनुष्का नवनीत देशमुख व इशिता नरेंद्र वर्मा या दोन्ही विद्यार्थींनीना ६७५ गुण मिळवून संयुक्तरित्या सर्वतृतीय आल्या आहेत. इ.मा.व. संवर्गातून भारती विष्णु चव्हाण ६६५ गुण, अनुसूचित जाती संवर्गातून साहिल राजेंद्र भगत ६३६ गुण, अनुसूचित जमाती संवर्गातून ओंकार हनुमंत परसकाळे ५९१ गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आले आहेत. महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांना ६५० पेक्षा अधिक, ९२ विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा अधिक व तसेच ५५० पेक्षा अधिक गुण असणारे २२७ विद्यार्थी, ५०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे ४०२ विद्यार्थी असल्याचे सिद्ध झाले आहे. हा निकाल एकूण १६८५ विद्यार्थ्यांचा आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. पी. आर. देशमुख, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, गोपाळ शिंदे, सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, डॉ. सुहास गोरे तसेच प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्रा. दिलीप देशमुख, प्रा. जयराज गंगणे, प्रा. विनोद झरीटाकळीकर आदींनी अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या