22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरजेईई-मेन्स परीक्षेत शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे घवघवीत यश

जेईई-मेन्स परीक्षेत शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे घवघवीत यश

एकमत ऑनलाईन

लातूर : नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) द्वारे दोन सत्रामध्ये जेईई-मेन्स-२०२२ परीक्षा शिव छत्रपती शिक्षण संस्थेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. शिव छत्रपती शिक्षण संस्थेअंतर्गत येणा-या राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेज व संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेतील सुमारे २१७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यापैकी १८२ विद्यार्थ्यांचे निकाल हाती आले त्यानुसार ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची संख्या ५ आहे. ९८ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ८ विद्यार्थी, ९७ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे १३ विद्यार्थी, ९६ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे १६ विद्यार्थी, ९५ पेक्षा अधिक पर्सेंटाईल अधिक गुण घेणारे २२ विद्यार्थी, ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ४८ विद्यार्थी, ८५ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ६३ विद्यार्थी, ८० पेक्षा अधिक पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण घेणारे ६९ विद्यार्थी तर ७५ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ७८ विद्यार्थी आहेत.

संस्थेच्या राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेजचा वरूण व्यंकटेश कुलकर्णी हा विद्यार्थी ९९.७४४३७३९3 इतके पर्सेंटाईल गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम आला आहे. निखिल गजानन मंिहद्रकर व महादेव संजय पाटील या दोन्ही विद्यार्थ्याने ९९.५८२६४८१ पर्सेंटाईल गुण मिळवून महाविद्यालयातून संयुक्तरित्या द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. निखिल गजानन मंिहद्रकर हा इतर मागास संवर्गातून महाविद्यालयातून प्रथम आला आहे. पल्लवी गंगाधर परगे ह्या विद्यार्थींनीने ९९.१५०८९१० पर्सेंटाईल गुणासह महाविद्यालयातून तृतीय तर मुलीतून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. अनुसूचित जाती संवर्गातून प्रतिक सदाशिव भिसे हा विद्यार्थी ९१.८३२६८१८ पर्संटाईल गुण प्राप्त करून प्रथम आला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, एसटीएनएमएसचे संचालक बी. ए. मैदर्गी, संचालक प्रा. दिलीप देशमुख, आयआयटी व एम्स बॅचचे समन्वयक प्रा.विनोद झरीटाकळीकर व इतर सर्व समन्वयक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या