चाकूर प्रतिनिधी
पीक विमा खात्यावर जमा करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने विमा कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन केले. तालुक्यातील अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालायास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने १२ डिसेंबरला निवेदन देऊन या प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी केली होती. शेतक-यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे नुकसान झाले होते. शेतक-यांना विमा मंजूर करुन शेतक-यांना द्यावे म्हणून २० दिवसांचे अल्टीमेट दिले होते पण शेतक-यांना विमा देण्यास टाळाटाळ करीत होते. विमा किती दिवसांत देणार याबाबात लेखी स्वरूपात आम्हा कालावधी द्यावे अशी मागणी केली असता.विमा प्रतिनिधी अरेरावीची भाषा केली. लेखी हमी न दिल्यामुळे विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. शेतक-याच्या खात्यावर पैसे टाकल्याशिवाय कुलूप काढू नये असा इशारा शिवसेना चाकूर तालुक्याच्या वतीने देण्यात आला आहे.
सन २०२२ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतक-यांनी पीकविमा भरला होता. बहुतांश शेतक-यांना विमा रक्कम मिळाली नाही, पीकविमा वितरण प्रक्रिया निर्दोष व पारदर्शी असावी. सर्व शेतक-यांंना झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात योग्य पंचनामा करून विमा मिळावा, ज्या शेतक-यांचे पंचनामे झाले त्याची पावती सरकारी कर्मचा-यांच्या स्वाक्षरीने शेतक-यांना मिळावी. एकाच महसूल मंडळात, एकाच गटात विमा वितरणात असणारी तफावत दूर करावी. थकित वीज बीलाच्या नावाखाली वीज जोडणी तोडू नये. आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.