22.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर शिवसेनेतर्फे आत्मनिर्भर योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ

शिवसेनेतर्फे आत्मनिर्भर योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना लातूर शहर कार्यालयात फेरिवाला व पथविक्रेत्यांचे आत्मनिर्भर योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली.

येथील शिवसेना शहर कार्यालयात सामाजिक अंतर ठेवून शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख नामदेव चाळक, शहर प्रमुख रमेश माळी, लातूर शहर महानगरपालिका फेरीवाला समितीचे सदस्य व ज्येष्ठ त्र्यंबक स्वामी, कुलदीप सुर्यवंशी, अक्षय चाळक, सुधाकर कुलकर्णी, वैभव बिराजदार, माधव कलमुकले, सुधीर केंद्रे, राजु कतारी, रोहीत दोपारे, सोमनाथ जाधव यांच्या उपस्थितीत लातूर शहरातील गरजु फेरीवाला व पथविक्रेत्यांचे आत्मनिर्भय योजनेचे ऑनलाईन अर्ज भरुन देण्यास सुरुवात करण्यात आली. तानाजी करपुरे, मनोज श्ािंदे, इंद्रजीत माने, विनोद बिराजदार, रामहरी ससाने, धनंजय पोतदार या फेरीवाला व पथविक्रेत्यांचे प्राथमीक स्वरुपात लातूर शहर शिवसेना कार्यालयात आत्मनिर्भर योजनेचे आॅनलाईन अर्ज भरुन देण्यात आले.

लॉकडाऊनमुळे शहरातील मोडकळीस आलेले पथविक्रेते व फेरिवाल्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करुन त्यांच्या व्यवसायास पुन्हा उभारी देण्यासाठी दहा हजार रुपये खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र पुरस्कृत पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत फेरीवाला व पथविक्रेत्यासाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ ही योजना पात्र फेरिवाले व पथविक्रेत्यांनाच लागु आहे. सदरील दहा हजार रुपयेचे कर्ज हे विनातारण असुन ते विविध कालावधीमध्ये तात्पुरते व्याजदर परतफेड करणारे, पुढील वाढीव खेळत्या भांडवलाच्या कर्जासाठी पात्र रहाणार आहेत.

व्याजदर बँकेच्या प्रचलीत दराप्रमाणे ‘आरबीआय’ च्या मार्गदर्शक सुचनेनुसार लागु असतील.तेंव्हा लातूर शहरातील लातूर शहर महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या पात्र फेरीवाले व पथविक्रेत्यांनी pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटवर आपण मोबाईल वरुन अथवा कोणत्याही महा ई सेवा केंद्रावर जाऊन आॅनलाईन अर्ज भरुन घ्यावा. सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, स्वत:चे बँक पासबुक, महानगरपालिकेतदाखल केलेल्या कागदपत्राची पोहच पावती व ओटीपी साठी फेरीवाला तथा पथविक्रेता नोंदणी वेळीचा मोबाईल नंबर सोबत ठेवावा, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिका फेरीवाला समितीचे सदस्य त्र्यंबक स्वामी यांनी केले आहे.

Read More  विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी : आ.पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या