26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरशिवसेना, युवासेनाने जाळला बंडखोर आमदारांचे बॅनर

शिवसेना, युवासेनाने जाळला बंडखोर आमदारांचे बॅनर

एकमत ऑनलाईन

चापोली : शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या विरोधात बंड पुकारल्याचे पडसाद चापोली येथे उमटले आहेत. या बंडाच्या विरोधात चापोली येथे शिवसेना व युवा सेनेच्यावतीने शिंदे व बंडखोराचे छायाचित्र असलेले बॅनर जाळून निषेघ व्यक्त करण्यात आला. गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील शिवसेनेच्या ४८ व अपक्ष १० अशा एकूण पन्नास आमदारांना घेऊन गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये या बंडखोरांनी मुक्काम ठोकला असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकार विरुद्ध बंड पुकारले आहे.

जाळण्यात आलेल्या बॅनरवर गद्दार असे लिहून त्या बॅनर ला जोडे मारून ते बॅनर जाळून शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात आला. हे आमदार जरी गद्दार झाले असले तरी शिवसेनेचा कार्यकर्ता हा कधीही गद्दार होणार नाही. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून येणा-या काळात चाकूर तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत करू अशा प्रतिक्रीया युवा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर, माजी पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार यांनी आंदोलनानंतर माध्यमांना दिल्या.

या आंदोलनासाठी युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख नाथा मद्रेवार, कामगार सेनेचे तालुकाप्रमुख गौस शेख, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख चांद मोमीन, इम्रान देशमुख, सतीश चामलेवाड, राजू श्रीमंगले, कार्तिक यंचेवाड, बाबा मोमीन, विशाल पवार, शैलेश येणगे, बालाजी कांबळे, इम्रान मणियार, किरण मद्रेवार, माधव माळी, माधव चाटे, सोमनाथ पवार, मनोज तत्तापुरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या