22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरलोकसहभागातून केला शिवरस्ता

लोकसहभागातून केला शिवरस्ता

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील सावनगीरा येथील शिवरस्त्याकरिता लोकप्रतीनिधी व प्रसाशनाकडे मागणी करूनही आंबुलगा ते बंधर रस्ता झाला नसल्याने अखेर ग्रामस्थानी लोकसहभागातून रस्ता तयार करून एक आदर्श निर्माण केला आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सावनगीरा ते बंधर आंबुलगा येथील रस्त्यावर पाणी साचून चिखल झाला होता. त्या भागातील शेतक-यांना जाण्या -येण्यास ञास होत होता. त्यामुळे तेथील शेतक-यांनी व काही ग्रामस्थानीं पुढाकार घेऊन शेतकºयाच्या व लोकसहभागातून रस्ता तयार केला आहे . हा रस्ता मेन रोड सावनगीरा ते बोटकुळ रोड बालाजी शेषराव सोळुंके यांच्या शेतापासून ते माजी सरपंच अभिमान्यू सोळुंके यांच्या शेतापर्यत करण्यात आला आहे.

या कामास बंधर रोडवरील शेतकरी बालाजी शेषराव सोळुंके, आंकुश सोळुंके, कुमार सोळुंके, आरंिवद सोळुंके, राघोबा सोमवंशी, शरद सोमवंशी, विलास सोळुंके, तानाजी सोळुंके, बबन सोळुंके, अशोक सोळुंके, सुभाष वश्विनाथ सोळुंके, बासुमियॉ सय्यद, हमीद सय्यद, हबीब सयद,मकबुल सयद, मेहराज सयद,सद्रिाम माधव सोळुंके,आभंग सोळुंके, हाणमंत सोळुंके, गोंिवद वामन सोमवंशी, आभिमान्यू सोळुंके, जैनोदिन आरब, दत्ता आंगद सोळुंके, सुभाष आण्णाराव सोळुंके, बालाजी काळे,युवराज सोळुंके, विनोद जाधव, प्रकाश सोळुंके, बालाजी सोळुंके, सद्रिाम सोळुंके,व सावनगीरा गावातील काही दानशूर नागरीकांनी त्या रस्त्याचा कसलाही संबध नसताना ग्रामपंचायत सदस्य युवराज जाधव, माजी सरपंच कमलाकर जाधव, कमलाकर सोमवंशी, पंडित जाधव, गणपत पाटिल,सोमेश्वर सोळुंके, रामदास सोमवंशी, पंढरी जाधव यांनी मदत केली आहे.

Read More  पाच तासांनंतर लातूर पुन्हा कडकडीत बंद

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या