मोती नगरातील एकाच कुटुंबातील ०९ सदस्यांना कोरोना : लातूर मध्ये ५० पैकी ३८ निगेटीव्ह
१० पॉझिटिव्ह तर २ अनिर्णित
लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १२ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी ०९ व्यक्ती ह्या दिनांक २८.०५.२०२० रोजी मोती नगर लातूर येथे आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहेत
१० पॉझिटिव्ह पैकी ०९ व्यक्ती दिनांक २८ मे २०२० रोजी मोती नगर लातूर येथे पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहेत व १ व्यक्ती देसाई नगर लातूर येथील असून ती व्यक्ती मुंबई वन प्रवास कन आलेली आहे. व त्या रुग्णास निमोनिया असून श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच त्या रुग्णास सध्या विलगीकरन कक्षात दाखल करण्यात आले आहे व ०२ व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण १६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच १६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चाकुर येथुन ०२ व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निलंगा येथील ०४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ०४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय, लातुर येथील ०५ व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ०५ व्यक्तींचे निगेटीव्ह आले आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक २९ मे २०२० रोजी एकुण ५० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ३८ व्यक्तींचे निगेटिव्ह, १० व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह तर २ व्यक्तीचे अहवाल अनिर्णित आलेले आहेत, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली आहे.
- लातूर जिल्हा कोरोना अपडेट
जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या -१२९( शिराढोण तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील एका रुग्णाची नोंद उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे, मात्र उपचार लातूर येथे सुरू आहेत)
-उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -६६
-उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या- ६१
-मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -०३
#लातूर: दि. 29 मे 2020 कोरोना अपडेट:
*उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -66*उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या- 61
*मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -03
*आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -01 pic.twitter.com/M5Irnuohh1
— District Information Office, Latur (@Infolatur) May 29, 2020