33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर धक्कादायक ...उदगीर शहरात आज १० नवीन  रुग्ण

धक्कादायक …उदगीर शहरात आज १० नवीन  रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण ९६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच ७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण १७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत व ३ व्यक्तीचे अहवाल ( Inconclusive) आले असल्यामुळे  त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.

आजपर्यंत एकुण ८३९१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजपर्यंत एकुण ३१३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३०४  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक ०४ मे  रोजी ८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे व एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे.

Read More  उदगीर शहर १९ मेपर्यंत कोरोनामुक्त होईल

आजपर्यंत २२ व्यक्तींचा Home Quarantine  कालावधी समाप्त झाला असुन एकुण ८२ व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

रेणापूर येथील १ व्यक्तीच्या  स्वॅबची तापसणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उस्मानाबाद येथील ६१ व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी  ५८ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ व्यक्तीचे अहवाल ( Inconclusive) आले असल्यामुळे  त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व एका व्यक्तीचा स्वॅब परिपुर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे व बीड येथील १० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत असे एकूण १२ पॉझिटिव्ह, ७८ निगेटिव्ह, ५ (Inconclusive) व १ Reject अहवाल आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या