मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर : काळजी घ्या-सावध रहा
लातूर : 2 कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर पोहचली आहे.
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दिनांक 6 जून 2020 रोजी औसा तालुक्यातील एक महिला गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आलेली होती. सदरील महिला ही मुंबईवरुन प्रवास करून आलेली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून सदरील महिला व्हेंटीलेटर वर होती. 11 जून रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
Read More सर्वोच्च न्यायालय : हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ देताय मग त्यावर व्याज कसं लावता ?
एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचारासाठी दाखल झालेला 70 वर्षांचा रुग्ण 11 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला होता. या रुग्णास पूर्वीपासून मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदय विकाराचा आजार होता. पाच वर्षापूर्वी त्यांचे बायपासची शस्त्रक्रिया झालेली होती. 11 जून रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. राजेश बोबडे, डॉ. किरण डावळे, डॉ. राम मुंढे, डॉ. मारुती कराळे व विभागप्रमुख डॉ. निलीमा देशपांडे यांनी दिली आहे.