21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील

लातूर जिल्ह्यातील दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्याचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांवर आल्याने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनूसार जिल्ह्यातील सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने आज दि. १ जूनपासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहातील. मात्र शनिवार व रविवारचा विकेंड लॉकडाऊन कायम राहिल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. व जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सोमवारी सायंकाळी फे सबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.

लातूर सद्यस्थितीत गृहविलगीकरण तसेच विविध कोविड केअर संटरमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या घटत चालली आहे. हा एक मोठा दिलासा लातूर जिल्ह्याला मिळत आहे. बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी सोमवारी सायंकाळी फे सबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले की, सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात यश मिळताना दिसत आहे. आजघडीला जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपर्यंत आला आहे. ही मोठी समाधानाची बाब आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी नव्या निर्देशांची माहिती देताना आजपासून जिल्ह्यातील सर्व आवश्यक वस्तु, सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहातील. दुपारी २ वाजल्यानंतर मात्र कोणीही रस्त्यावर दिसणार नाही. नागरिकांच्या प्रत्येक हलचालीवर पोलिसांची नजर असणार आहे. संचारबंदी व वीकेंडच्या निर्बंधाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के झाला आहे. मात्र आता आव्हान आहे ते म्युकरमायकोसीसचे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने आशा वर्कर्सच्या माध्यमातून गावागावात जाऊन घरोघरी भेट दिली जाणार आहे. म्युकरमायकोसीसचे रुग्ण शोधून त्या रुग्णास तत्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था केली जात आहे.. ग्रामीण भागात म्युकरमायकोसीसची दररोज चाचणी केली जाणार आहे. ग्रामीण रुग्णाल, प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्रात कोविशिल्ड व कोव्हॅसीनची लस उपलब्ध झाली आहे. ४५ वर्षांपुढील लातूर जिल्ह्यातील दिव्यांगासाठी दि. १ व २ जून असे दोन दिवस लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्र्य गावसाने यांनी यावेळी खरीप हंगामासाठी लातूर जिल्ह्यात उपलब्ध बी-बियाणे, खते, महाबीजचे बियाणे, डीएपी खत, घरगुती बियाणे याची उपलब्धता याची माहिती दिली. तर डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी लातूर शहरात उभा राहात असलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टची सविस्तर माहिती
दिली.

‘ब्रेक द चेन’ चे नवे निर्देश
→ ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकुण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे पुढीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
→ सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने, जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत ती सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सुरु ठेवता येतील.
→ सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल, मात्र शनिवार, रविवार सर्व दुकाने बंद राहातील.
→ आवश्यक नसलेल्या वस्तुदेखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरित करता येतील, दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
→ कोरोनाविषयक कामे करणा-या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील.

ठिबक सिंचनाचा वापर करून हळद लागवड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या