26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeलातूरश्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे घवघवीत यश

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे घवघवीत यश

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या श्री मारवाडी राजस्थान विद्यालय आणि श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय लातूर यातील विद्यार्थ्यांना अथक परिश्रम घेऊन दोन्ही विद्यालयाच्या निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली. श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या प्रविष्ट २८५ विद्यार्थ्यांपैकी २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९७.१९ टक्के इतका लागला आहे. तसेच श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाच्या प्रविष्ट २०१ विद्यार्थ्यांपैकी २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल ९९.५० टक्के इतका लागला आहे.

दोन्ही विद्यालयाचे ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी ५२ आहेत. तर १५३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह विद्यालयाच्या निकालाचा आलेख प्रतिवर्षीप्रमाणे कायम राखून संस्था व विद्यालयाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला. गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विश्वस्त लक्ष्मीरामण लाहोटी, संस्थाध्यक्ष शैलेशकुमार लाहोटी, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपाणी, सचिव आशिष बाजपाई, शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्वा, सूर्यप्रकाश धूत, संस्था पदाधिकारी, संस्था सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या