Thursday, September 28, 2023

श्रीरामच्या शिक्षणास मिळाला ‘आधार माणुसकीचा’

भिसे-वाघोली: लातूर तालुक्यातील भिसे वाघोली येथील सामान्य कुटुंबातील श्रीराम कैलास लोखंडे याने दहावी परीक्षेमध्ये ९७.२० टक्के गुण घेत मोठे यश संपादन केले आहे. श्रीरामच्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करत मुलांस शिक्षणासाठी पाठबळ दिले. कैलासचे वडील गावातच केशकर्तनालय चालवतात व आई दुस-याच्या शेतात मजुरी करते. संसाराचा गाडा सांभाळत श्रीरामचे आई-वडील शिक्षणासाठी खुप परिश्रम घेत आहेत. त्याच्या पुढील शिक्षणासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यासंदर्भाने ‘एकमत’ने वृत्त दिले होते. त्याची दखल घेत अंबाजोगाई येथील आधार माणुसकीचा या उपक्रमाने आधार दिला आहे.

श्रीरामला पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्नं आहे. परंतु, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने पुढील शिक्षणाचा खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर उभा राहिल्याची कल्पना स्वाभिमानी शेतकरी संघटना (पक्ष) प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांना समजली असता त्यांनी वंचीत कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी पाठबळ देणा-या अंबाजोगाई येथील आधार माणुसकाचा या उपक्रमाचे प्रमुख अ‍ॅड. संतोष पवार यांना श्रीरामच्या कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती दिली असता, अ‍ॅड संतोष पवार यांनी भिसे वाघोली येथे येऊन या कुटुंबाची भेट घेऊन श्रीरामचा सत्कार केला तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च समाजातील दानशूर वेक्तीकडुन निधी उपलब्ध करुन भागविण्यात येईल, असे आश्वासन दिले.संत गाडगेबाबा सेवा भावी संस्था, अंबाजोगाई अंतर्गत आधार माणुसकीचा उपक्रमामुळे श्रीरामच्या पुढील शिक्षणासाठी मोठा आधार मिळाल्याने त्यांचे कुटुंबीय आनंदी झाले . या प्रसंगी सत्तार पटेल, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष स्वाभिमानि पक्ष नवनाथ शिंदे, रामदास गिरी, सौदागर भिस अनंत निकते, महादेव कुचेकर हे उपस्थित होते.

Read More  कोरोनावर रामबाण उपाय मिळण्याची शक्यता नाही-डब्ल्यूएचओ

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या