लातूर : कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातल्याने भारतात विशेषत: लातूरमध्ये कोरोनला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी बि. पी. पृथ्वीराज यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्यास शनिवार व रविवारी या दोन दिवसात शेतक-यांनी व व्यापा-यांनी प्रतिसाद दिल्याने बार्शी रोडवरील दयानंद गेट जवळील वर्दळीच्या रयतु बाजारात शुकशुकाट दिसून आला.
दयानंद गेट परिसरातील रयतू भाजीपाला बाजारपेठेत सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यत भाजीपाला विक्री करणा-यांची व भाजीपाला खरेदी करणारांची मोठी गर्दी असते. खेडयापाडयातून शेतकरी कोथींबीर, वांगे, दोडका, शेवगा, भेंडी, गवारी, टोमॅटो, बटाटे, कांदे, फुलकोबी, पत्ताकोबी, पालक, शेपू, हिरवी मिरची, शिमला मिरची, ककडी, दुधी भोपळा, कोथींबीर विक्रीसाठी शेतकरी येतात. समांतर रस्त्यावर जमणारी वाहणे व भाजीपाला घेणा-या व्यापारांचा एकच गोधळ दररोज असतो. दयानंद गेट ते पाण्याच्या टाकीपर्यत सतत वर्दळ असलेला परिसरत जनता कफ्युमुळे शनिवार व रविवारी परिसर शांत…शांत…दिसून आला.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी झालेल्या पावसामुळे जिल्हयात पालेभाज्यांच्या उत्पादनवार शेतक-यांनी भर दिला आहे. त्यामुळे लातूरच्या रयतू भाजीपाला बाजारपेठेत बीड जिल्हयातील बर्दापूर, उस्मानाबाद जिल्हयातील पळसप, जागजी, लातूर तालुक्यातील शेतक-यांच्या बरोबरच लातूर जिल्हयातील रेणापूर, बर्दापूर, औसा आदी ठिकाणाहून शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येतात. मात्र जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी जनता कर्फ्यूची हाक दिल्याने शेतक-यांनी या हाकेला प्रतिसाद देत दोन दिवस भाजीपाला लातूर शहरात विक्रीस न आणता गावातच राहिले.
दुस-या दिवशीही व्यापारी व शेतक-यांचा प्रतिसाद
लातूर जिल्हयात कोरोना रूग्णांची दररोज वाढत असलेली संख्या रोखण्यासाठी शनिवार व रविवारी या दिवशी जनता कर्फ्यूची जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घोषणा केली होती. लातूरच्या रयतू बाजार पेठेत दररोज भाजीपाला विक्रीसाठी येणा-या शेतक-यांनी जिल्हाधिका-यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवार प्रमाणेच रविवारीही भाजीपाला विक्रीसाठी घेवून आले नसल्याने रयतू बाजार पेठेत शुकशुकाट दिसून आला.