22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरबहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील यलमवाडी येथून जाणा-या निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या भरावसाठी शासनाने पाडलेल्या खड्ड्यात जनावरे राखण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहीण-भावाचा बुधवारी दि १८ रोजी पडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळ-हळ व्यक्त केली जात आहे.

निलंगा तालुक्यातील यलमवाडी येथील कृष्णा विजय राजे (वय ९) व पुजा विजय राजे (वय ११) यासह गावातील अनेक मुले जनावरे चारण्यासाठी निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या बाजूने सकाळपासून गेले होते. निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या भराव भरण्यासाठी शासनाने जवळपास तीन एकर क्षेत्र संपादीत केले होते. या कालव्याच्या भरावासाठी वाहण्यात आलेल्या मुरूम व दगडामुळे तेथे मोठा खड्डा निर्माण झाला होता.

मागील महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेरणा प्रकल्प शंभर टक्के भरला असून शिवारातील विंधन विहीरी भरून वाहिल्या आहेत. अशाच खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे या पाण्याचा धोका निर्माण होणार अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच यलमवाडी येथील कांही शाळकरी मुले दररोज आपले गुरे घेऊन चारण्यासाठी जात असत त्यातच कृष्णा व त्यांची बहीण पुजा हे दोघेही जनावरे घेऊन चारण्यासाठी गेले असता कृष्णा हा पाण्यात गेलेल्या जनावरांना हाकण्यासाठी गेला तो बुडत असताना बहीण पुजा हीने डोहात उडी टाकून भावाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तिचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळ-हळ व्यक्त केले जात आहे.

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर सकारात्मकता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या