24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूर सिंधुताई सपकाळ माई पुरस्कार प्राचार्य प्रीती पटवारी यांना प्रदान

 सिंधुताई सपकाळ माई पुरस्कार प्राचार्य प्रीती पटवारी यांना प्रदान

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने येथील दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन या महाविद्यालयातील प्राचार्या आर्किटेक्ट प्राचार्य प्रीती पटवारी यांना पहिला सिंधुताई सपकाळ राज्यस्तरीय माई पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा सोहळा १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी सायंकाळी अंबाजोगाई येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राजक्ता सुरेश धस या होत्या तर सातारा येथील तेजस्विनी महिला सामाजिक संस्थेचे अध्यक्षा संगीता शिंदे, आयोध्या हंबर्डे, नगराध्यक्षा पल्लवी धोंडे, प्राचार्या प्रीती पटवारी उपस्थित होत्या. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरम लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन, सागर मंत्री, विशाल लाहोटी यांच्याकडून तसेच महाविद्यालयाकडून कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या