22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरनिलंगा महावितरण कार्यालयासमोर ठिय्या

निलंगा महावितरण कार्यालयासमोर ठिय्या

एकमत ऑनलाईन

निलंगा : तालुक्यातील खडक उमरगा या गावात घराच्या वरून वद्यिुतधारा गेल्या असल्यामुळे येथील एका युवकास प्राण गमवावे लागले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी निलंगा येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या मांडला. जोपर्यंत सदरील विद्युत तारा हटविण्यात येणार नाहीत व मयताच्या नातेवाईकास नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे महावितरण कार्यालयात अधिकारी व कर्मचा-याची एकच तारांबळ उडाली.

निलंगा तालुक्यातील खडकउमरगा या गावात पंचवीस घरावरून विद्युत ताराचे कनेक्शन देण्यात आले असल्यामुळे या उघड्या तारा मुळे महिला ग्रामस्थांना माळवदावर वावरण जिकरीचे झाले. माळवदावर अन्नधान्य वाळवणे, पापड घालने, कपडे वाळू घालने या विद्युत तारामुळे मज्जाव झाला होता. तसेच उघड्या तारामुळे कधीही धोका होऊ शकतो म्हणून सन २०१५ पासून ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात अनेक वेळा चकरा मारून सदरील विद्युत धाराचे स्थलांतर करावे यासाठी मागणी केली होती. मात्र संबंधित अधिका-यानी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावातील एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. दि ९ जून रोजी विश्वनाथ शिवाजी कदम या २७ वर्षे युवकांस या उघड्या विद्युत ताराचा शॉक लागून जीव गमवावा लागला. त्याची पत्नी, आई ,वडील, एक मुलगा व एक मुलगी यांचा आधार गेल्याचे राग मनात धरून निलंगा येथील कार्यालयावर आज ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढला होता.

मात्र येथील कार्यकारी अभियंता व्ही आर ढाकणे यांनी सदरील मयत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी महावितरण कंपनीकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करणार व मदत मिळवून देणार तसेच दोन दिवसानी वद्यिुत ताराचे स्थलांतर काम सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी मिळालेल्या आश्वासनावर आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी नरंिसग भुरे, देवानंद चव्हाण, दिगंबर बोयणे, मंगेश कदम, विष्णू कदम, शंकर भुरे, संदीप चव्हाण, परशुराम कदम ,केशव कदम , विठ्ठल कदम ,सतीश चव्हाण ,दुशंत कदम, उमेश कदम, गोंिवद काळे ,नागनाथ स्वामी, अनिकेत भूरे ,अजय तेलंगे ,शिवाजी भुरे, रामंिलग भुरे, तुकाराम कदम, दत्तात्रय मल्लीशे, किशोर काळे, किशोर कदम ,पंडित पोद्दार, अजय कदम ,बालाजी कदम, कांताबाई सूर्यवंशी, कस्तुरबाई काळे, मंगल बोयणे, कांताबाई चव्हाण, अनिता म्हेत्रे, सिंधू कदम, सोनाबाई भुरे, सुमत्रिाबाई पाटील, शशिकला म्हेत्रे, उज्वला काळे, वनिता काळे आदीसह सुमारे दोनशे ग्रामस्थांनी निवेदनावर स्वाक्ष-या करून ठिय्या आंदोलन केले.

दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या