24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूरपानगावात एकाच दिवशी आढळले सहा कोरोनाबाधित

पानगावात एकाच दिवशी आढळले सहा कोरोनाबाधित

एकमत ऑनलाईन

पानगाव : पानगांव येथील प्रा.आ.केंद्रात रॅपीड अ‍ॅन्टीझेनव्दारे २४ व्यक्तींची तपासणी केली असता सहा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पानगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक (७५) वर्ष यांची प्रकृती नसल्याने त्यांना लातूरच्या खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता कोव्हीडची तपासणी करुन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला असता त्यांनी पानगाव प्राथमीक आरोग्य केंद्रात रॅपीड अ‍ॅन्टीझेन तपासणी केली असता शुक्रवारी दि. ३१जुलै रोजी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्यांच्या संपर्कातील सात जणांची तपासणी केली असता तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.यांच्यासह दिवसभरात इतर चोवीस जणांची तपासणी केली असता त्यातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने एकूण कोरोना बाधीतांची संख्या सहा झाली असुन कोरोनाबाधीत रुग्ण रहात असलेला ब्राम्हण गल्ली, बावगे गल्ली,रेल्वे स्टेशन,परिसरातील धर्मापुरी रोड कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री हूजरे व डॉ.यशवंत दहिफळे यानी दिली.रेणापूरचे तहसीलदार राहुल पाटील यांनी भेट देऊन संबंधीत आधिका-यांना सूचना दिल्या. यावेळी सरपंच सुकेश भंडारे, तलाठी कमलाकर तिडके उपस्थित होते.

Read More  जळकोट तालुक्यातील पंधरा हजार शेतक-यांनी भरला सव्वा कोटींचा पीक विमा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या