24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरशहरात सहा तास वीज पुरवठा खंडीत

शहरात सहा तास वीज पुरवठा खंडीत

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महावितरणच्या वतीने लातूर शहरात मान्सूनपूर्व कामे केली जात आहेत. त्यामुळे रविवार दि. २९ मे रोजी शहरातील बहुतांश भागात तब्बल सहा तास वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. रविवारची सुटी, सर्वजन घरी, उन्हाचा कहर आणि वीज गुल. महावितरणने नागरिकांची परीक्षाच घेतली. महावितरणच्या वतीने अधुन-मधुन मान्सूनपूर्व कामे केली जातात. खांबांवरील विजेच्या तारांमधून वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, वाकलेले विजेचे खांब सरळ करणे, रोहित्रांची दुरुस्ती करणे आदी कामे केली जातात. यंदाही अशी कामे केली जात आहेत.

रविवारी सकाळी ११ वाजल्यापसून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीत होता. तब्बल सहा तास वीज गायब झाल्याने नागरिकांचे हाल झाले. रविवारची सुटी असल्याने जवळपास सर्वचजन आपापल्या घरी होते. बाहेर चटकते उन्ह, बाहेर उकाडा त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. येथील बी. एस. एन. एल. च्या मुख्य कार्यालयात विजेच्या तारांना स्पर्श होत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडताना काही प्रमाणात मोठे वृक्षही तोडण्यात आले आहेत.

दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. वीज पुरवठ्याची यंत्रणा सक्षम केली जाते. परंतू, थोडासाही वारा सुटला आणि पावसाचे चार थेंंब पडले तरी तासंतास वीजपुरवठा खंडीत होतो. कामे करुन जर तोड्याशा कारणांनी वीज पुरवठा खंडीत होत असले तर केलेले कामच योग्य झाले नसल्याची टिका केली जाते. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देणे अपेक्षीत आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या