31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeलातूरसहा ट्रॅक्टर घाण, कचरा बाहेर काढला

सहा ट्रॅक्टर घाण, कचरा बाहेर काढला

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरातील अंबेजोगाई रोड अंबा हनुमान ते जुना रेणापुर नाका दुभाजकाची स्वच्छता. स्वच्छ लातूर सुंदर लातूर या उपक्रमांतर्गत ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या वतीने करण्यात आली. अंदाचे सहा ट्रॅक्टर घाण, कचरा बाहेर काढला.उपरोक्त मार्गावरील रस्ता दुभाजकात सडलेल्या, कुजलेल्या भाज्या, शिळे अन्न, हॉटेलमधील शिल्लक राहिलेले अन्न, दिवाळीच्या स्वच्छतेत निघालेला कचरा, मेलेले उंदीर-मांजर, दुधाच्या पिशव्या, पानपट्टीचा कचरा, ज्युस सेंटरचे ग्लास, चहाचे ग्लास, मेडीकलचा कचरा, दारुच्या बाटल्या, केळीचे खांब, अशा दुर्गंधीयुक्त घाणीने भरलेले दुभाजक ग्रीन लातूर वृक्ष टीमने स्वच्छ केले.

ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या २० सदस्यांनी सर्व दुभाजक स्वच्छ करून अंदाजे ६ ट्रक्टर घाण बाहेर काढली. यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर उपस्थित होते. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांचे कौतुक करुन मनपा लातूर तर्फे सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नागरीकांनी आपल्या घरातील – दुकानातील कचरा घंटागाडीतच द्यावा, दुभाजकता कचरा टाकू नये, आपलं लातूर स्वच्छ करण्यास सर्वांनी मदत करावी, असे आवाहन महानगरपालीका उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टीमचे समन्वयक डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, अ‍ॅड. सर्फराज पठाण, अ‍ॅड. वैशाली यादव-लोंढे, स्वाती यादव, प्रमोद निपानीकर, सार्थक शिंदे, मोईज मिर्झा, सुलेखा कारेपुरकर, सिताराम कंजे, प्रा. सुनील नावाडे, डी. एम. पाटिल, शिवशंकर सुफलकर, महेश भोकरे, आनंद सुर्यवंशी, अरविंद फड, मंगेश शिंदे, गोविंद शिंदे, स्नेहा गावंडी, शैलेश सुर्यवंशी, खंडेराव गंगणे भुषण पाटील, डॉ. अमृत पत्की, प्रिया नाईक, सुरज पाटील, बाळासाहेब बावणे, संघपाल साळवे, विक्रांत भुमकर यांनी परिश्रम घेतले.

जिल्ह्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरु : जिल्हाधिकारी दिवेगावकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या