25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरपुरवठ्याअभावी संथ लसीकरण

पुरवठ्याअभावी संथ लसीकरण

एकमत ऑनलाईन

लातूर : गेल्या एक-दीड महिन्यापासून सुरळीत लसपुरवठा हो नसल्याने लातूरातील लसीकरणाची गती पुन्हा मंदावली आहे. शनिवारी सायंकाळी संपलेला लससाठा आणि रात्री पुरवठाच न झाल्याने रविवारी शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले तर सोमवारीही लसीकरण सुरु होईल की नाही? याबाबत साशंकता आहे. लस घेण्याबाबत नागरिक उत्सूक असले तरी पुरवठ्याअभावी लसीकरणात व्यत्यय येत आहे.

लातूर जिल्ह्यात दि. १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. प्रारंभी केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाल्याने नागरिकांनी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला. त्यानंतर कोव्हिशिल्डचा पुरवठा नियमित झाला नाही. त्यामुळे पहिला डोस घेऊन ८४ दिवसांचा कालावधी झालेल्यांना अद्यापही दुस-या डोसची प्रतिक्षा आहे. दरम्यान कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाली आणि लसीकरण सुरु झाले. मागणी मात्र कोव्हिशीलडचीच आजही आहे. नव्या लसीकरण धोरणानंतर लसपुरवठा सुरळीत होईल आणि लसीकरण वेगाने सुरु होईल, असे चित्र जुनच्या शेवटच्या आठवड्यात दिसत होते. या काळाता महानगरपालिकेनेही प्रतिदिन लसीकरणाची मर्यादा वाढवली. परंतू, जुलैपासून लशीचा पुरवठा सुरळीत नसल्यामुळे अनेकदा दिवसातून केवळ तीनच तास लसीकरण केले आहे. परिणामी प्रतिदिन लसीकरणाची संख्या घटत गेली.

जुलैच्या तिस-या आठवड्यात तर लशीचा साठा उपलब्धच नसल्यामुळे लसीकरण बंद करण्याची वेळ आली. लशींचा पूर्ण खडखडाट झाल्यानंतरच रात्री उशिरा साठा दिला जातो. त्यानंतर दुस-या दिवशी हा साठा वाटप करुन दुपारी १२ वाजल्यानंतरच लसीकरण सुरु करावे लागते. त्यामुळे मनुष्यबळासह सर्व व्यवस्था उपलब्ध असूनही केवळ तीनच तास लसीकरण केले जाते. लशींचा साठा सुरळीत उपलब्ध होत नसल्यामुळे मनुष्यबळासह सर्व सुविधांचा वापर योग्यरितीने केला जात नाही, असे महानगरपालिकेच्या अधिका-यांनी सांगीतले. शहरातील लशींचा साठा शनिवारी पुर्णपणे संपल्यामुळे रविवारी शहरातील सर्वच केंद्र बंद होती. सोमवारी तरी लसीकरण होईल की नाही? या बाबत साशंता आहे. रात्री उशिरा लसींचा साठा प्राप्त होतो. त्याचे वाटप सकाळी केले जाते. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर लस पोहंचवून प्रत्येक्ष लसीकरण सुरु करण्यास दुपारी १२ वाजतात. लशींचा साठा सुरळीत प्राप्त झाला तर आम्हालाही योग्य नियोजन करुन अधिकचा साठा केंद्रांना देणे शक्य होईल, असे महानगरपालिकेच्या अधिका-याने सांगीतले.

लातूर शहरातील लसीकरणाचा प्रगती अहवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या