25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरअपत्यहिन दांपत्यांच्या चेह-यावर हास्य फुलविणारे ; टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानातून...

अपत्यहिन दांपत्यांच्या चेह-यावर हास्य फुलविणारे ; टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानातून ८० लाख बालकांचा जन्म

एकमत ऑनलाईन

लातूर : अपत्यहीन दांपत्यांच्या चेह-यावर हास्य फुलविणारे तंत्रज्ञान म्हणजे टेस्ट ट्युब बेबी हे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन आतापर्यत जगभरात ८० लाखांपेक्षा अधिक बालकांचा जन्म झाला आहे, अशी माहिती येथील स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. कल्यण बरमदे यांनी दिली.

जगात इंग्लंडमध्ये २५ जुलै १९७८ रोजी डॉ. पॅट्रिक स्टेप्टो व रॉबर्ट एडवर्ड्स यांच्या हॉस्पिटलमध्ये लुईस ब्राउन या बालिकेचा जन्म टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने झाला. म्हणून हा दिवस जागतिक टेस्ट ट्यूब बेबी दिवस म्हणून साजरा केला जातोय. या निमित्ताने डॉ. बरमदे यांनी या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. घरात छोटे मुल असल्यावर जे आनंद वातावरण पाहायला मिळते ते कितीही संपत्ती असलेल्या घरात पहायला मिळत नाही,. मुलांसाठी अनेक दांपत्य सर्वतोपरी प्रयत्न, उपाय करीत असतात, अशा दांपत्यांसाठी टेस्ट ट्युब बेबीचे आव्हीएफ तंत्रज्ञान साधारत: ४३ वर्षांपुर्वी वैद्यकीय क्षेत्रात आले. ते आता वरदान ठरले आहे. टेस्ट ट्युब बेबीचे हे आव्हीएफ तंत्रज्ञानही आता पूर्वीपेक्षाही अधिक प्रगत झाले आहे. जगात या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आतापर्यंत ८० लाखांहून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे. नैसर्गिकरित्या तयार होणारे भ्रुण हे टेस्ट ट्यबच्या सहाय्याने फलित करून ते मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येते. नैसर्गिक बाळ तयार न होता फलनाची प्रक्रिया ही टेस्ट ट्यूबमध्ये, लॅबोरेटरीमध्ये होते केली जाते म्हणून याला टेस्ट ट्यूब बेबी असे म्हटले जाते, अशी माहिती डॉ. बरमदे यांनी दिली.

ज्या महिलांची गर्भवाहक नलिका बंद आहे तसेच पुरुष बीजात कमजोरी आहे, अशा दांपत्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसते. अशांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे आणि जीवनात आनंद निर्माण करून देणारे असे आहे. अदयावत आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गर्भधारणा करणे सुलभ झाले आहे. सध्याच्या जगात पर्यावरणाच्या वाढत्या असमतोलाने पुरुषातील शुक्र जंतूंचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे या प्रणालीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. केवळ एवढेच नव्हे तर स्त्रियांमध्येही लग्नाचे वाढते वय, नोकरी – करिअरला प्राधान्य देताना स्त्रिया विवाहानंतर आपल्याला अपत्य प्राप्तीत अडथळे येतील याचा विचारही करीत नाहीत. ही बाब वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येते. पुरुषही विवाहाचे वय निघून जात असले तरी अगोदर करिअरला प्राधान्य देतात. पण त्यावेळी ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की, विवाहानंतर अपत्यप्राप्ती वेळेत होणे खूप आवश्यक असते. परिणामत:, लग्नाचे वय वाढत असल्याने फलन प्रक्रियेमध्ये विलंब होतो आणि अशा दांपत्यांना आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागतो, असेही डॉ. बरमदे यांनी सांगीतले.

मन्याड नदीत लिंबोटी धरणाखाली अवैध वाळू उपसा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या